"उद्धव ठाकरेंवर 'अँजिऑप्लास्टी' शस्त्रक्रिया नाही", आदित्य ठाकरेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 02:34 PM2024-10-14T14:34:29+5:302024-10-14T19:35:11+5:30

उद्धव ठाकरे यांच्यावर 'अँजिऑप्लास्टी' शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आदित्य ठाकरे यांनी याबद्दल माहिती दिली. उद्धव ठाकरे यांंच्या नियमित तपासण्या करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितलं.

Former Chief Minister Uddhav Thackeray admitted to Reliance Hospital; Information about having undergone angioplasty | "उद्धव ठाकरेंवर 'अँजिऑप्लास्टी' शस्त्रक्रिया नाही", आदित्य ठाकरेंनी दिली माहिती

"उद्धव ठाकरेंवर 'अँजिऑप्लास्टी' शस्त्रक्रिया नाही", आदित्य ठाकरेंनी दिली माहिती

मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी नियमित तपासणीसाठी मुंबईतील एच.एन रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी गेले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या रुग्णालयातील तपासण्यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली आहे.  

उद्धव ठाकरे हे आरोग्य तपासणीसाठी एच.एन रिलायन्स रुग्णालयात गेले होते. नियमित तपासण्यासाठी करण्यासाठी सकाळी ८ वाजता उद्धव ठाकरे रुग्णालयात गेले होते. याआधी २०१२ साली ठाकरेंवर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 

अँजिओप्लास्टी म्हणजे काय?

अँजिओप्लास्टी एक अशी शस्त्रक्रिया आहे ज्याचा उपयोग करून ह्दयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये ब्लॉक झालेल्या धमन्या उघडण्यासाठी केला जातो. अँजिओप्लास्टी ओपन हार्ट सर्जरीशिवाय हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्त प्रवाह पुनर्संचयित करते. हृदय विकाराचा झटका येणं यांसारख्या आपातकालीन स्थितीत अँजिओप्लास्टी केली जाते. अँजियोप्लास्टीला परक्यूटेनियस कोरोनरी इंटरवेंशन (PCI) असेही म्हटले जाते. 

हे करताना एक लांब, पातळ ट्यूब (कॅथेटर) रक्त वाहिन्यांमध्ये टाकली जाते आणि ब्लॉक आर्टरीज  उघडल्या जातात. कॅथेटरच्या टोकाला एक छोटा फुगा असतो. जेव्हा कॅथेटर एखाद्या ठिकाणी ठेवला जातो तेव्हा धमन्याच्या संकुचित भागात हा फुगा फुगवला जातो. यामुळे धमन्याच्या काठाला असलेले प्लेक किंवा ब्लड क्लॉट दाबले जाते ज्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यास मदत होते. अँजियोप्लास्टी केल्यानंतर डॉक्टर कॅथेटर बाहेर काढून टाकतात. ते ठिकाण झाकण्यासाठी एका पट्टीचा वापर केला जातो.  यात सर्जिकल प्रक्रियेच्या  तुलनेत कमी जोखिम असते.

डॉक्टर कधी करतात शिफारस?

रुग्णाला छातीत दुखण्यासारखी लक्षणे दिसतात. ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होतो. अँजिओग्राफीने हृदयाच्या कोरोनरी धमन्या किंवा इतर धमन्यांमधील अडथळा दिसून येतो तेव्हा डॉक्टर अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतात. ही शस्त्रक्रिया करायला ३० मिनिटे ते ३ तासाहून अधिक काळही लागू शकतो. अँजिओप्लास्टीनंतर रुग्णाला १-२ दिवसांत घरी सोडले जाते. साधारणपणे एक आठवड्यासाठी डॉक्टर त्यांना विश्रांतीचा सल्ला देतात. कुठलाही व्यायाम न करण्याची सूचना करतात. 

Web Title: Former Chief Minister Uddhav Thackeray admitted to Reliance Hospital; Information about having undergone angioplasty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.