जेव्हा स्वत:ला राजा दाखवण्यासाठी...; अमृता फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 10:35 AM2021-08-26T10:35:47+5:302021-08-26T10:36:20+5:30

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांवर केली टीका.

former cm devendra fadnavis wife amruta fadnavis indirect criticize uddhav thackeray narayan rane action | जेव्हा स्वत:ला राजा दाखवण्यासाठी...; अमृता फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका

जेव्हा स्वत:ला राजा दाखवण्यासाठी...; अमृता फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका

googlenewsNext
ठळक मुद्देअमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांवर केली टीका.

 केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर काल दिवसभर राज्यभर शिवसेनेकडून आंदोलनं आणि निदर्शनं झाली. यात राणेंना अटक झाली आणि रात्री उशिरा त्यांची जामीनावर सुटका झाली. दरम्यान, या प्रकरणी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं. या कारवाई प्रकरणी भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि कारवाईचा निषेधही केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली.

 
"जेव्हा कोणतीही व्यक्ती स्वत:ला राजा दाखवण्यासाठी धडपडत असते तेव्हा तो खरा राजा नसतो," अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी टीकेचे बाण सोडले आहेत. महाविकास आघाडीवर यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी सातत्यानं टीका केली आहे. नारायण राणे यांच्यावरील कारवाईनंतर भाजपचे अनेत नेतेही आक्रमक होताना दिसत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेवर निशाणा साधला होता.

युवासैनिकांना शाबासकी
मुंबईत जुहू येथे नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर युवासैनिकांनी केलेल्या आंदोलनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. याठिकाणी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात युवासैनिकांनी जोरदार आंदोलन केलं. यात राणे समर्थक आणि युवासैनिकांमध्ये राडाही झाला. पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता. 

आमदार नितेश राणे यांचं आव्हान स्वीकारुन वरुण सरदेसाई कार्यकर्त्यांसह राणेंच्या बंगल्याबाहेर जाऊन घोषणाबाजी करत होते. यात पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान काही कार्यकर्ते देखील जखमी झाले होते. दरम्यान, युवासेनेच्या याच कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची रात्री उशिरा भेट घेतली. वरुण देसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे यांची 'वर्षा' येथे भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन केलेल्या युवासैनिकांचं पाठ थोपटून कौतुक केल्याची माहिती समोर आली आहे. 

Web Title: former cm devendra fadnavis wife amruta fadnavis indirect criticize uddhav thackeray narayan rane action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.