माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे निधन

By Admin | Published: February 16, 2015 04:56 PM2015-02-16T16:56:51+5:302015-02-16T19:09:07+5:30

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सोमवारी दुपारी निधन झाले आहे.

Former Deputy Chief Minister R. R. Patil dies | माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे निधन

माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे निधन

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सोमवारी दुपारी निधन झाले आहे. पाटील कर्करोगाने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात गेले काही आठवडे उपचार सुरू होते. अनेकांचे जीवन उध्वस्त करणा-या डान्स बार्सवर बंदीची कारवाई करणा-या पाटील यांची गृहमंत्रीपदाची कारकिर्द चांगलीच गाजली. सांगलीजवळच्या तासगावातून अत्यंत तळातून उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारलेल्या पाटील यांची प्रतिमा ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा अशी होती. तब्बल पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या पाटील यांनी सर्वात जास्त काळ गृहमंत्रीपदही भूषवले होते.
राष्ट्रवादी पक्षाला या घटनेने जबर धक्का बसला आहे. पाटील हे अत्यंत संवेदनशील असलेला व सामान्य माणसाशी जोडलेला नेता अशा शब्दांत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दु:ख व्यक्त केले. ते विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही पाटील यांची मैत्री होती. राजकीय वैमनस्य होतं परंतु व्यक्ती म्हणून कधीही एकमेकांचे संबंध बिघडले नाहीत असे तावडे म्हणाले. 
तंटामुक्त गाव अभियानाची सुरुवात गृहमंत्रीपदाच्या काळात सुरू करणा-या आबांची ओळख उत्कृष्ट वक्ता, सभागृहामध्ये उत्तम काम करणारी व्यक्ती तसेच प्रशासनाची उत्तम जाण असलेला नेता अशी ओळख होती. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये समन्वय ठेवण्यात महत्त्वाची भूमिकाही आबांनी काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारच्या काळात बजावली आहे. हुषार मुलगा म्हणून शंकरराव चव्हाण कौतुक करायचे अशी आठवण अशोक चव्हाण यांनी सांगितली. आज संध्याकाळी पाटील यांचे पार्थिव ७ ते ९ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे  अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून उद्या तासगावला अंजनी येथे त्यांच्या गावी शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.
सच्चा सहकारी गेला, आबांनी अनेक संकटं पचवली यशवंत रावांनी मला घडवलं आबंच्या नेतृत्वाची मला मदत झाली, त्यांचा प्रवास थक्क करणारा होता  अशा शब्दांत आबांच्या आठवणी सांगत शरद पावारांनी आपला शोक व्यक्त केला.तर आर.आर. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राला धक्का बसला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 
 डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतू आमच्यावर दुर्दैवाचा घाला झाला आहे, आर.आर. अतिशय लहान कुटुंबातून आलेला नेता असून राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी दिली .
आर.आर. पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील राजकरणात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली आहे. 
आमच्या तालुक्याचा तारणहार गेला, त्यांच्यामुळेच आमच्या तालुक्याला ओळख मिळाली, त्यांनी कायम मित्रासारखी वागणूक दिली, माझं लग्न त्यांनीच करून दिलं विरोधकांनाही त्यांनी विरोधकांसारखी वागणूक दिली नाही. जवळच्या गावांना पाणी उपलब्ध करून दिल्याने गावे सुजलाम सुफलाम झाली, लोकांच्या प्रश्नाव्यतिरिक्त त्यांनी कधी कोणती चर्चा केली नाही अशी प्रतिक्रिया आबांचे खाजगी सचिव बाळासाहेब गुरव यांनी यावेळी दिली. 
 पक्षाचं कधीही नभरून काढता येणारं नुकसान झालं आहे, पक्षाला त्यांची गरज असताना ते अकाली पणे आमच्यातून निघून गेले, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये समन्वय साधण्यास त्यांची कायम मदत झाली, पक्षाच्या स्थापनेपासून त्यांनी शरद पवारांना साथ दिली. विरोधी पक्ष नेते म्हणून केलेली भाषणं गाजली, त्याचा पक्षाला फायदाच झाला. महाराष्ट्र एका सुस्कृंत राजकरण्याला मुकला असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्यक्त केली 
 
 
 
 

Web Title: Former Deputy Chief Minister R. R. Patil dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.