माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग यांचे निधन
By Admin | Published: June 17, 2016 10:23 PM2016-06-17T22:23:40+5:302016-06-17T22:23:40+5:30
राज्याचे माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग यांचे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुंबई येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. 17 - राज्याचे माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग यांचे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुंबई येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. मूळचे अमरावती येथील रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी सूर्यकांत जोग यांनी १९८४ मध्ये राज्याचे पोलीस महासंचालक पद भूषविले. गेल्या काही दिवसांपासून ते आपले नातू कौस्तूभ यांच्याकडे उपचार घेत होते. मंत्रालयाशेजारील वसाहतीमधील कौस्तूभ जोग यांच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी मुंबई येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी चिखलदऱ्यांमध्ये निवासी शाळा सुरू केली होती. याशिवाय सामाजिक कार्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. १९५३ मध्ये ते भारतीय पोलीस सेवेमध्ये दाखल झाले होते. बुलढाण्यांमध्ये पोलीस अधीक्षकपद त्यांनी भूषविले. महाराष्ट्रामध्ये औरंगाबादचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांना पहिली नियुक्ती मिळाली.
शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अमरावतीमध्ये घेणाऱ्या सूर्यकांत जोग यांच्या पत्नीचे ३ आॅक्टोबर १९८६ ला निधन झाले. तत्पूर्वी १९८४ मध्ये त्यांच्या २३ वर्षीय मुलाचे विमान अपघातात तेजपूर येथे निधन झाले. मीग २१ला तो अपघात झाला होता. त्या धक्क्यातून सावरत असतानाच जोग यांच्या आयपीएस अधिकारी असलेल्या थोरल्या मुलाचे निधन झाले. त्यानंतर ते कधी अमरावती तर कधी मुंबई मुक्कामी राहत होते.