माजी न्यायाधीश हाजीर हो!

By admin | Published: August 7, 2014 11:30 PM2014-08-07T23:30:28+5:302014-08-07T23:30:28+5:30

अल्पवयीन मुलीवर माजी न्यायाधीश नागराज सुदाम शिंदे (वय 35, रा. आंबेगाव पठार) याने बलात्कार केल्याप्रकरणी पीडितेच्या वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

The former judge is Hazare! | माजी न्यायाधीश हाजीर हो!

माजी न्यायाधीश हाजीर हो!

Next
>पुणो : अल्पवयीन मुलीवर माजी न्यायाधीश नागराज सुदाम शिंदे (वय 35, रा. आंबेगाव पठार) याने बलात्कार केल्याप्रकरणी पीडितेच्या वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, मुलीच्या जबाबात शिंदे यानेच बलात्कार केल्याचे नमूद आहे. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी शिंदेच्या जामीन अर्जावर सुनावणी करीत, त्याला उद्या न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला. 
शिंदे याच्या तात्पुरत्या अटकपूर्व जामीन अर्जाची मुदत गुरुवारी संपल्याने यावर सुनावणी झाली. शिंदे याची प}ी घरी नसताना, सुमारे दीड महिन्यापूर्वी त्याने ओळखीच्या 15 वर्षीय मुलीला दागिने आणि सदनिका देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. सातारा जिल्ह्यातील खंडाळा न्यायालयामध्ये गेल्या पाच-सहा महिन्यांपूर्वी शिंदे हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून सेवेत होता. गुरुवारी आरोपीच्या वतीने अॅड. नितीन पवार यांनी जामीन अर्जासाठी युक्तिवाद केला. सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी काम पाहिले. त्यांनी पीडित मुलीने दिलेला जबाब न्यायालयात वाचून दाखविला. त्यामध्ये शिंदे याने बलात्कार केल्याचे नमूद आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीच्या पोलीस कोठडीची गरज असल्याचा युक्तीवाद पवार यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून शिंदेला उद्या न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)
 
शिंदेचा फ्लॅट सील करण्यात आला आहे. लहान मुलांवरील लैंिगक अत्याचार कायद्यामध्ये जन्मठेपेची तरतूद आहे. पीडित मुलीच्या वैद्यकीय अहवालानुसार, तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.
-अॅड. उज्ज्वला पवार, 
सरकारी वकील.

Web Title: The former judge is Hazare!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.