माजी आमदार नरेंद्र पवार यांचा भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा नामंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 07:01 PM2020-02-16T19:01:42+5:302020-02-16T19:03:20+5:30

भाजपा प्रदेश बैठकीत नवी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नरेंद्र पवार भाजपातच असल्याचे केले जाहीर आहे.

Former MLA Narendra Pawar's resignation of BJP membership has not been approved | माजी आमदार नरेंद्र पवार यांचा भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा नामंजूर

माजी आमदार नरेंद्र पवार यांचा भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा नामंजूर

googlenewsNext

कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुक अपक्ष लढवलेले तत्कालीन आमदार व भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवत असताना आपल्यामुळे भारतीय जनता पार्टी अडचणीत येऊ नये म्हणून भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.निवडणूकित पराभव झाल्यानंतर नरेंद्र पवार यांच्या भाजपात असण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी नरेंद्र पवार यांना पुन्हा सक्रिय होऊन पक्षाच्या वाढीसाठी काम करण्यास सांगितले.

नरेंद्र पवार यांनीही पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामात सक्रिय होऊन कामाला सुरुवात केली. दरम्यान नवी मुंबई येथे सुरू असलेल्या प्रदेश बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नरेंद्र पवार यांनी निवडणुकी दरम्यान दिलेला भाजपा सदस्यत्व पदाचा राजीनामा नामंजूर करत ते भाजपातच असल्याचे जाहीर केले.

कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार म्हणून नरेंद्र पवार यांनी 2014 ते 2019 पर्यंत काम केले आहे.2019च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेला सोडल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत 44 हजारांपेक्षा जास्त मते घेतली होती. दरम्यान आमदार म्हणून गेली 5 वर्षे विविध कार्यक्रमाच्या व उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर चांगले काम केले आहे. संघटक म्हणून काम करताना महाराष्ट्रभर पक्ष वाढीचे काम  केले आहे. याची नोंद घेत नवी मुंबई येथे भाजपा प्रदेश बैठकीत नरेंद्र पवार यांना पुन्हा भाजपात सक्रिय होण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

निवडणूक काळात दिलेला राजीनामा नामंजूर करून भाजपातच असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, व्ही. सतीशजी, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विनय सहस्त्रबुद्धे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजाताई मुंढे, आमदार व माजी मंत्री रवींद्र चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. नरेंद्र पवार यांना पुन्हा सक्रिय होण्यासाठी दाखवलेल्या विश्वासामुळे कल्याण - डोंबिवलीसह राज्यभरात पुन्हा एकदा उत्साह संचारला आहे.

Web Title: Former MLA Narendra Pawar's resignation of BJP membership has not been approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.