माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना "लोकमत"कडून जीवन गौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2017 09:50 PM2017-04-11T21:50:54+5:302017-04-11T21:54:25+5:30

देशाचे राष्ट्रपतीपद भूषवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

Former President Pratibha Patil from "Lokmat", Life Gaurav Award | माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना "लोकमत"कडून जीवन गौरव पुरस्कार

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना "लोकमत"कडून जीवन गौरव पुरस्कार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11 - देशाचे राष्ट्रपतीपद भूषवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिभाताई पाटील यांनी 2007 ते 2012 या काळात देशाच्या राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला होता.  

 

मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा सुरू आहे. आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे. युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.   या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात आपल्या कार्याची छाप पाडणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांना गौरवण्यात आले.   

 

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर च्या चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" आणि  वैद्यकीय यामधील 14   पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार देईऊ गौरवण्यात आले. यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

(कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडू - राजनाथ सिंह)

(रिंकू राजगुरू ठरली चित्रपट महिला कलाकार विभागातील "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर")

(राजकारण विभागात आमदार बच्चू कडू ठरले "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर")

 

 

प्रतिभाताई पाटील यांच्याविषयी थोडक्यात माहिती

प्रतिभाताई देवीसिह पाटील (शेखावत) यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात झाला. इ.स. १९६२ साली त्या जळगाव विधानसभा मतदार संघातून विधानसभेवर निवडून आल्या.  त्यांनी सतत वीस वर्षे निरनिराळ्या खात्याच्या मंत्री म्हणून काम पाहिले.  त्यांनी  राज्यमंत्रिमंडळात आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, समाजकल्याण व सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य व समाजकल्याण, दारूबंदी व पुनर्वसन, शिक्षणमंत्री अशा विविध खात्यांचे काम पाहिले. इ.स. १९८५ साली राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून निवडून आल्या. तो त्यांचा कार्यकाल संपल्यावर अमरावतीहून १९९१ साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्या.  त्यानंतर राजस्थानच्या राज्यपाल म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले. पुढे  25 जुलै 2007 ते 24 जुलै 2012 या काळात त्यांनी देशाचे राष्ट्रपतीपद भूषवले. 

 

या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची एव्हाना परंपरा झाली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.

 

लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 

 

‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे. 

 

नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.

 

सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लिक करा

 

http://lmoty.lokmat.com/vote.php

Web Title: Former President Pratibha Patil from "Lokmat", Life Gaurav Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.