पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी माझ्या घरी आले होते - हेडली

By admin | Published: March 25, 2016 10:33 AM2016-03-25T10:33:27+5:302016-03-25T13:51:28+5:30

माझ्या वडिलांचा 25 डिसेंबर 2008 मध्ये मृत्यू झाल्यानंतर तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी माझ्या घरी सांत्वनासाठी आले होते अशी माहिती हेडलीने दिली आहे

Former Prime Minister Yousuf Raza Gilani had come to my house - Headley | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी माझ्या घरी आले होते - हेडली

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी माझ्या घरी आले होते - हेडली

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २५ - 'माझ्या वडिलांचा 25 डिसेंबर 2008 मध्ये मृत्यू झाल्यानंतर तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी माझ्या घरी सांत्वनासाठी आले होते', अशी माहिती मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडलीने दिली आहे. 26/11 हल्ल्याप्रकरणी अमेरिकेत शिक्षा भोगत असलेल्या हेडलीची मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उलटतपासणी सुरु आहे. त्यावेळी त्याने ही माहिती दिली आहे. 
 
'मी लष्कर-ए-तोयबासोबत काम करत असल्याचं माझ्या वडिलांना स्वत: सांगितलं होतं. माझ्या वडिलांनी याला विरोध दर्शवला होता. माझे वडील, भाऊ आणि काही नातेवाईकांचा पाकिस्तान निर्मितीत सहभाग होता मात्र त्यांची माहिती मी उघड करत करु शकत नसल्याचं', डेव्हिड हेडलीने सांगितलं आहे. 'अमेरिकेत झालेल्या 9/11 दहशतवाही हल्ला प्रकरणी माझी कधीच चौकशी झालेली नाही. पुर्व पत्नी फैजाने केलेल्या तक्रारीच्या आधारावर मात्र पाकिस्तानमध्ये एकदा अटक करण्यात आली होती', अशी माहिती डेव्हिड हेडलीने दिली आहे.
 
दरम्यान शुक्रवारी सकाळी उलटतपासणीदरम्यान '७ डिसेंबर १९९७१ रोजी भारतीय विमानांनी माझ्या शाळेवर बॉम्बहल्ला केला होता, त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच मी लष्कर-ए-तोयबामध्ये सहभागी झालो असल्याचा', खुलासा हेडलीने केला आहे. 'लहानपणापासून माझ्या मनात भारतीयांबद्दल द्वेष आहे, ७ डिसेंबर १९९७१ रोजी भारतीय विमानांनी माझ्या शाळेवर बॉम्बहल्ला केला होता, त्या हल्ल्यात शाळेतील अनेक करणा-या कर्मचा-यांचा मृत्यू झाला. त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच मी लष्कर-ए-तोयबामध्ये सहभागी झालो', अशी माहिती हेडलीने दिली आहे. 
 

Web Title: Former Prime Minister Yousuf Raza Gilani had come to my house - Headley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.