यूपीतील माजी सरपंच मुंबईत करायचा घरफोड्या, मीरारोड पोलिसांनी अँटॉपहिल येथे त्याला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 03:38 PM2017-12-20T15:38:54+5:302017-12-20T15:39:22+5:30

मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीला मीरारोड पोलिसांनी मुंबईच्या अँटॉप हिल भागातुन अटक केली आहे.

The former Sarpanch of Uttar Pradesh, who is lodged in Mumbai | यूपीतील माजी सरपंच मुंबईत करायचा घरफोड्या, मीरारोड पोलिसांनी अँटॉपहिल येथे त्याला ठोकल्या बेड्या

यूपीतील माजी सरपंच मुंबईत करायचा घरफोड्या, मीरारोड पोलिसांनी अँटॉपहिल येथे त्याला ठोकल्या बेड्या

Next

- धीरज परब
मीरारोड - मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात घरफोड्या करणारा सराईत आरोपी आसिफ अब्दुल शेख याला मीरारोड पोलिसांनी मुंबईच्या अँटॉप हिल भागातुन अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील एका ग्रामसभेचा माजी सरपंच असलेल्या आसिफ वर घरफोडीचे सुमारे २० गुन्हे दाखल असुन मुंबई गुन्हे शाखे सह विविध पोलीस ठाण्याांचे पोलीस त्याचा शोध घेत होते.

मीरारोडच्या शितल नगर मध्ये राहणारया उषा पुत्रण ह्या आई कडे गेल्या असता त्यांचे बंद घर २२ नोव्हेंबर रोजी चोरट्याने फोडुन घरातील ३० हजार रोख, ८६ ग्रॅमचे सोन्याचे दागीने, दोन एटीएम कार्ड सह अन्य ओळखपत्रे चोरीला गेली होती. दरम्यान या चोरीची कल्पना नसलेल्या पुत्रण यांच्या मुलास एटीएम मधुन ५० हजार रोख काढण्यात आल्याचा संदेश आला असता त्याने आईला विचारणा केली. पण उषा यांनी आपण पैसे काढले नसल्याचे सांगत घराकडे धाव घेतली त्यावेळी चोरी झाल्याचे समजले.

या प्रकरणी मीरारोड पोलीसात गुन्हा दाखल झाल्यावर वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरीक्षक भरत सोनावणे सह विजय ब्राह्मणे, निकम यांनी तपास सुरु केला. आरोपीने ५० हजार रुपयांची रक्कम दहिसर येथील एटीएम मधुन काढल्याचे उघड झाल्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीने चेहरा दिसु नये म्हणुन टोपी घातली होती. परंतु बाहेर असलेल्या कारचा क्रमांक मात्र सापडला.

सदर कारच्या क्रमांकाची नोंदणी ज्या नावे होती त्याने कार विकली होती, पण वीमा मात्र पनवेल येथील एका व्यक्तीच्या नावे असल्याने त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता सदरची कार त्याने आपला मित्र आसिफ वापरत असल्याचे सांगीतले.

पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या मित्रास आसिफशी संपर्क करायला लावला. आसिफ हा एका टॅक्सीत बसत असल्याचे दिसताच पोलीसांनी त्याचा पाठलाग करत टॅक्सी अडवली. पण आसिफ मात्र दार उघडुन पळु लागला असता त्याला पाठला करुन पोलीसांनी पकडले. गुन्ह्यात वापरलेली कार व कटावणी आदी जप्त करण्यात आली आहे. तो दिवसाच चोरी करायचा.

मुळचा विरारचा जन्म असलेला आसिफ हा वयाच्या १४ व्या वर्षा पासुनच घरफोड्या करत आलाय. बंद घर हेरुन तो चोरी करत असे. मग तो आपल्या उत्तरप्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातील रामपुर रजवाडी गावी पळुन जात असे. विमानाने तो ये जा करत असे. काही महिन्याने पुन्हा मुंबई, ठाणे, पालघर भागात येऊन घरफोड्या करत असे.

तो २०१० मध्ये गावचा प्रधान म्हणुन पण निवडुन आला होता. प्रधान असताना सुध्दा २०१४ मध्ये त्याला घरफोडी प्रकरणी अटक झाली होती. दिड वर्षा पुर्वी देखील वसईतील चोरी प्रकरणी त्याला युपीच्या एसटीएफ ने अलाहबाद येथुन अटक केली होती. जेल मधुन सुटुन त्याने पुन्हा घरफोड्या सुरु केल्या होत्या. नवी मुंबईत तर एका पोलीसाच्या घरीच त्याने चोरी केली होती.

त्याच्यावर नवी मुंबई, दहिसर, नवघर, तुळींज, विरार, बोईसर, वालिव आदी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मुंबई गुन्हे शाखेची युनीट ११ सह विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस त्याचा शोध घेत होते अशी माहिती श्रीकांत पाडुळे यांनी दिली.
 

Web Title: The former Sarpanch of Uttar Pradesh, who is lodged in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.