गड-किल्ल्यांना मिळणार नवी झळाळी

By admin | Published: September 18, 2016 01:25 AM2016-09-18T01:25:57+5:302016-09-18T01:25:57+5:30

‘स्वच्छ भारत’ अभियानाला प्रतिसाद देत हे अभियान १५ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील किल्ल्यांवर राबवले जाणार आहे.

The fort will get a new light | गड-किल्ल्यांना मिळणार नवी झळाळी

गड-किल्ल्यांना मिळणार नवी झळाळी

Next


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाला प्रतिसाद देत हे अभियान १५ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील किल्ल्यांवर राबवले जाणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर जिल्ह्यांतील सुमारे १०० किल्ल्यांवर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात शनिवारी मुंबईतून करण्यात आली.
महाराष्ट्राला लाभलेला गड-किल्ल्यांचा वैभवशाली वारसा जतन करण्याचे काम राज्य शासनाचा पुरातत्त्व विभाग, केंद्रीय पुरातत्त्व विभाग, गड संवर्धन समिती आणि गड संवर्धन निगडित स्वयंसेवी संस्था यांनी हाती घेतले आहे. मुंबईतील शिवडी, सेंट जॉर्ज किल्ला, वरळी येथील किल्ल्यांवरील स्वच्छता मोहिमेला शनिवारी प्रारंभ झाला. हे गड-किल्ले स्वच्छता अभियान १५ आॅक्टोबरपर्यंत सुरू राहील. (प्रतिनिधी)

Web Title: The fort will get a new light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.