नादुरुस्त ओव्हरलोड ट्रकचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 04:33 AM2017-02-16T04:33:51+5:302017-02-16T04:33:51+5:30

नादुरुस्त झालेला ओव्हरलोड ट्रक अचानक उतारावर ४०० ते ५०० फूट मागे जाऊन दोन मोटारी, एक छोटा मालवाहू टेम्पो,

The foul weather of the overloaded truck | नादुरुस्त ओव्हरलोड ट्रकचा धुमाकूळ

नादुरुस्त ओव्हरलोड ट्रकचा धुमाकूळ

Next

कुरुळी (जि. पुणे) : नादुरुस्त झालेला ओव्हरलोड ट्रक अचानक उतारावर ४०० ते ५०० फूट मागे जाऊन दोन मोटारी, एक छोटा मालवाहू टेम्पो, एक दुचाकी व पानटपरीला धडक देऊनच थांबला. या घटनेत रस्त्यालगत मोटारीत हवा भरण्यासाठी उभा असलेल्या एकाचा मृत्यू झाला, तर दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
हा थरारक प्रकार पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कुरुळीफाटा (ता. खेड) येथे मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. अब्दुल उर्फ ए. जे. मोमीन (वय ४८, सध्या रा. जय गणेश साम्राज्य, पांजरपोळ भोसरी, मूळ रा. बागेवाडी, जि. विजापूर,कर्नाटक) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सविता मनोजकुमार टंडन (वय ३९, रा. पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक चंद्रा पी. कुशवाहा (वय २५,रा. धुमनगंज अलाहाबाद, उत्तर प्रदेश) याच्यावर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कुरुळीजवळील सोनवणेवस्ती येथे अवजड मालाने भरलेला ट्रक अचानक मागे येऊ लागला. भरधाव जाणाऱ्या एका मोटारीला या ट्रकने धडक दिली. त्यानंतर एका छोटा मालवाहू टेम्पोला धडक दिली. यानंतर ट्रकने होंडा सिटी मोटारीला धडक दिली. रस्त्याच्या दुभाजकाला आदळून या ट्रकने रस्त्यालगत हवा भरण्यासाठी उभ्या असलेल्या मोटारीला धडक दिली. लगतच असलेल्या श्लोक पान स्टॉलवर हा ट्रक धडकल्यानंतर थांबला. पान स्टॉलचालक सोपान तावडे याने वेळीच बाहेर उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला. (वार्ताहर)

Web Title: The foul weather of the overloaded truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.