देवनार डम्पिंग परिसरात आढळला मृतदेह

By admin | Published: January 18, 2017 02:30 AM2017-01-18T02:30:27+5:302017-01-18T02:30:27+5:30

वाशी खाडीलगतच्या झुडपांमध्ये मंगळवारी दुपारी ४० ते ४५ वर्षीय एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला

Found dead in Devnar dumping area | देवनार डम्पिंग परिसरात आढळला मृतदेह

देवनार डम्पिंग परिसरात आढळला मृतदेह

Next


मुंबई : वाशी खाडीलगतच्या झुडपांमध्ये मंगळवारी दुपारी ४० ते ४५ वर्षीय एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
देवनारच्या डम्पिंग ग्राउंडला लागून असलेल्या खाडीलगत काही मच्छीमार जात असताना त्यांना हा मृतदेह झुडपांमध्ये आढळला. त्यांनी तत्काळ ही माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटलेली नाही. मृत्यूचे कारण समोर आले नसून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Found dead in Devnar dumping area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.