चितळे बंधूचे संस्थापक भाऊसाहेब चितळे यांचे निधन

By admin | Published: March 20, 2016 03:19 PM2016-03-20T15:19:11+5:302016-03-20T15:29:28+5:30

पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधु मिठाईवालेचे संस्थापक रघुनाथराव ऊर्फ भाऊसाहेब चितळे यांचे रविवारी सकाळी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले.

Founder of Chitale brother Bhausaheb Chitale passed away | चितळे बंधूचे संस्थापक भाऊसाहेब चितळे यांचे निधन

चितळे बंधूचे संस्थापक भाऊसाहेब चितळे यांचे निधन

Next

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. २० - पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधु मिठाईवालेचे संस्थापक रघुनाथराव ऊर्फ भाऊसाहेब चितळे यांचे रविवारी सकाळी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने दूरदष्टी असलेला यशस्वी उद्योजक आपल्याला सोडून गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. 
रघुनाथराव यांनी १९५० मध्ये चितळे बंधू मिठाईवालेची स्थापन केली. चितळे बंधुंच्या मिठाबरोबरच बाकरवडी प्रसिद्ध आहे. चवदार बाकरवडीचा विषय निघताच सर्वप्रथम चितळे बंधुंचे नाव समोर येते. चितळे बंधु हा आज जगप्रसिद्ध ब्राण्ड आहे. 
 
१९४० साली रघुनाथरावांचे वडिल भास्कर गणेश उर्फ बाबासाहेब चितळे यांनी डेअरी व्यवसाय सुरु केला. मात्र भाऊसाहेबांनी डेअरी व्यवसायापुरतेच मर्यादीत न रहाता त्यापेक्षा मोठे स्वप्न बघितले व १९५० साली चितळे बंधूची स्थापना केली. अपार मेहनत, कष्ट करुन ग्राहकांचा विश्वास संपादन केला आणि देशभरात चितळे बंधू मिठाईचा व्यवसाय विस्तार केला. 

Web Title: Founder of Chitale brother Bhausaheb Chitale passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.