बनावट दारूची वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक
By admin | Published: July 5, 2017 03:51 AM2017-07-05T03:51:04+5:302017-07-05T03:51:04+5:30
मध्य प्रदेशातून बनावट दारू वाहतुकीसाठी दुचाकींचा सर्रास वापर होत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या धाडसत्रातून
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मध्य प्रदेशातून बनावट दारू वाहतुकीसाठी दुचाकींचा सर्रास वापर होत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या धाडसत्रातून निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली, तर तिघे पसार झाले आहेत. सूरज परतेती (२५), गोविंद सिरसाम (२१), अर्जुन कुमरे (२८), प्रवीण भलावी (२०, ता. मोर्शी) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
मध्य प्रदेशातील धारूड गावातून काही युवक दुचाकीने बनावट
दारू आणत असल्याची गोपनीय
माहिती मिळाली होती. त्याआधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
अंधाराचा फायदा घेत आरोपी पळून गेले. मात्र, घटनास्थळी सापडलेल्या दुचाकीच्या आधारे चार युवकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दुचाकींसह दोन लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.