उदगाव दरोड्याप्रकरणी चौघांना अटक, पाच लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त ; अन्य तिघे साथीदार फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 05:14 PM2017-09-15T17:14:32+5:302017-09-15T18:05:23+5:30
उदगाव(ता. शिरोळ) येथे दरोडा टाकून महिलेचा खून करुन साडेसात लाख किंमतीचा ऐवज लंपास करणा-या चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलीसांनी शिताफीने अटक केली.
कोल्हापूर, दि. 15 - उदगाव(ता. शिरोळ) येथे दरोडा टाकून महिलेचा खून करुन साडेसात लाख किंमतीचा ऐवज लंपास करणा-या चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलीसांनी शिताफीने अटक केली. त्यांचेकडून दोन दूचाकी, बारा तोळे सोन्याचे दागिने, हत्यारे असा सुमारे पाच लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्य तिघे साथीदार फरार आहेत. त्यांचेवर कोल्हापूरसह सांगली, पुणे, अहमदनगर येथे जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
संशयित आरोपी आकाश नामदेव पवार उर्फ जाबाज उपकाºया पवार (वय २०, रा. इंदीरानगर, झोपडपट्टी, तासगाव, जि. सांगली), मैनेश झाजम्या पवार (३५, रा. इटकर, ता. वाळवा, जि. सांगली), शेळक्या जुरब्या पवार (४९, रा. समडोळी, ता. मिरज, जि. सांगली), विशल उर्फ मुक्या भिमराव पवार (२३, रा. बहादुरवाडी, ता. वाळावा, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत.
उदगांव ते शिरोळ जाणारे बायपास रोडवर निकम मळा येथे शेतवडीत प्रा. प्रितम बाबूराव निकम यांचा बंगला आहे. १३ आॅगस्ट रोजी रात्री बंगल्यावर दरोडा पडला. यावेळी आरडाओरड केल्याने दरोडेखोरांनी प्रितम यांच्या आई-वडीलांवर खूनी हल्ला करुन घरातील साडेसात लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. या हल्यामध्ये अरुणा निकम (५५) यांचा मृत्यू झाला. तर बाबूराव निकम हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांचा एक डोळा निकामी झाला आहे. याप्रकरणी प्रा. प्रितम निकम यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या दरोडा व खून प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हा गुन्हा उघडकीस आनण्यास पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. गुन्ह्याचे गांर्भीय पाहून घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी भेट देवून तपासाबाबत बैठक घेवून मार्गदर्शन केले.