दोन अपघातांत नऊ जण ठार, साखरपुड्यासाठी जाताना औरंगाबादच्या चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 04:57 AM2018-06-26T04:57:27+5:302018-06-26T04:57:31+5:30

राज्यात सोमवारी सकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत तब्बल नऊ जणांचा बळी गेला

Four of Aurangabad's deaths in two accidents have killed nine people | दोन अपघातांत नऊ जण ठार, साखरपुड्यासाठी जाताना औरंगाबादच्या चौघांचा मृत्यू

दोन अपघातांत नऊ जण ठार, साखरपुड्यासाठी जाताना औरंगाबादच्या चौघांचा मृत्यू

Next

कोल्हापूर/औरंगाबाद : राज्यात सोमवारी सकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत तब्बल नऊ जणांचा बळी गेला. त्यापैकी निपाणी येथे मालवाहू बोलेरो आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच औरंगाबाद येथे कार उलटून झालेल्या अपघातात साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या नियोजित नवरदेवासह चौघे ठार झाले.
कर्नाटकातील घटप्रभा येथून भाजीपाला घेऊन कोल्हापूरला येत असताना टायर फुटल्याने मालवाहू बोलेरो जीप दुभाजकाला धडकून पलीकडच्या रस्त्यावरील आयशर टेम्पोला समोरून धडकली. पुणे-बंगलोर महामार्गावर निपाणी येथील ईदगाह मैदानासमोर झालेल्या या भीषण अपघातात शब्बीर करीम सय्यद-बागवान (२८), नदीम इसाक बागवान (२४), फय्यूम सलीम बागवान (२०), या कोल्हापूरच्या तीन भाजी विक्रेत्यांचा; तसेच राजमहमद अब्दुलगफार बागवान (३०) व आयशर टेम्पोचालक रमेश बसाप्पा (४६) या बेळगावातील दोघांचा मृत्यू झाला. टेम्पोचा क्लिनर आनंद लम्माणी (२०, बेळगाव) हा जखमी असून त्याच्यावर निपाणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसºया घटनेत जालना रोडवरील करमाडनजीकच्या सटाणा फाट्याजवळ चालकाचा ताबा सुटून कारने रस्त्यावर सात ते आठ वेळा कोलांट्या घेतल्या. या अपघातात औरंगाबादेतील राजा ऊर्फ शहजाद युनूस शेख (२३), तबरेज खान राजू खान (२६), शेख महंमद मुजफरोद्दीन वाहिजोद्दीन शेख (२६), अबुदबीन हसनबीन समेदा (२५) या मित्रांचा मृत्यू झाला. तसेच कारचालक उमर चाऊस हसनबीन समेदा (२४) आणि शफिक खान शमीम खान (२४) हे दोघे गंभीर जखमी झाले.

पुण्यातही चौघे ठार : पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कारची उभ्या ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात चौघे ठार झाले. ओंकार पोळ (२७, शिंदेवाडी, भोर, मूळ रा. सांगली), अश्विनी आसवल (३६, पुणे), उज्ज्वला सणस (३५, पुणे), अरुणा भोसले (३५) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी साताºयाला चालले होते.

मैंदर्गीहून अक्कलकोटकडे (जि. सोलापूर) भरधाव येणाºया ट्रकची धडक बसून रस्ता ओलांडणारा युवक ठार झाल्याची घटना बोरीउमरगे (ता. अक्कलकोट) बसस्थानकात घडली. सिद्धाराम खंडू पुजारी-बºहाणपुरे असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर पळून जाणाºया देवेंद्र व्ही. विजयकुमार (३१, वेल्लोर, तामिळनाडू) या ट्रकचालकाला लोकांनी पाठलाग करून पकडले.

Web Title: Four of Aurangabad's deaths in two accidents have killed nine people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.