पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवार व गुरुवारी १५ - १५ मिनिटांचे चार ब्लॉक
By Admin | Published: June 14, 2016 07:51 PM2016-06-14T19:51:11+5:302016-06-14T19:53:40+5:30
दुपारी १२ ते सायंकाळी ४ या कालावधीमध्ये प्रत्येकी १५-१५ मिनिटांचे चार ब्लाँक घेण्यात येणार असल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत हिण्याची शक्यता
लोणावळा : दि. १४ - पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा व अमृतांजन पुल या ठिकाणी धोकादायक दरडी (लूज स्केल) काढण्याच्या कामासाठी बुधवार (दि.१५) व गुरुवार (दि.१६) रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या कालावधीमध्ये प्रत्येकी १५-१५ मिनिटांचे चार ब्लाँक घेण्यात येणार असल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत हिण्याची शक्यता असल्याने द्रुतगतीवरुन प्रवास करणार्यांनी वेळे्े नियोजन करुन बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी 15-15 मिनिटांचे किमान चार ब्लॉक घेण्यात येणार असून दुपारी बारा वाजल्यापासून धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे यावेळेत द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. आडोशी बोगदयाजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम 15 व 16 जूनला करण्यात येणार आहे. या दरम्यान 15-15 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदना सांगण्यात आले आहे.
द्रुतगती मार्गावर बुधवार व गुरुवारी १५ - १५ मिनिटांचे चार ब्लाँक लोणावळा : दि. १४ (वार्ताहर) - पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा व अमृतांजन पुल या ठिकाणी धोकादायक दरडी (लूज स्केल) काढण्याच्या कामासाठी बुधवार (दि.१५) व गुरुवार (दि.१६) रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या कालावधीमध्ये प्रत्येकी १५-१५ मिनिटांचे चार ब्लाँक घेण्यात येणार असल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत हिण्याची शक्यता असल्याने द्रुतगतीवरुन प्रवास करणार्यांनी वेळे्े नियोजन करुन बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी 15-15 मिनिटांचे किमान चार ब्लॉक घेण्यात येणार असून दुपारी बारा वाजल्यापासून धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरु होणार आहे.
त्यामुळे यावेळेत द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. आडोशी बोगदयाजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम 15 व 16 जूनला करण्यात येणार आहे. या दरम्यान 15-15 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदना सांगण्यात आले आहे. द्रुतगती मार्गावर गेल्या पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये काही प्रवाशांना जीवही गमवावा लागला होता. तेव्हापासून पावसाळ्याच्या तोंडावर राज्य सरकारकडून धोकादायक दरडी हटविण्याचे काम करण्यात येत आहे. बहुतांश काम पुर्ण झाले असून काही प्रमाणात राहिलेले काम हे ब्लाँक घेऊन दोन दिवसात करण्यात येणार आहे.