चार दिवस होरपळीचेच!
By admin | Published: April 16, 2017 02:21 AM2017-04-16T02:21:56+5:302017-04-16T02:21:56+5:30
उष्णतेच्या लाटेमुळे चैत्रात वैशाख वणवा पेटला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रदेखील होरपळून गेला आहे. शनिवारी राज्यात
पुणे : उष्णतेच्या लाटेमुळे चैत्रात वैशाख वणवा पेटला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रदेखील होरपळून गेला आहे. शनिवारी राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५़२ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. ही उष्णतेची लाट आणखी चार दिवस तरी कायम राहील.
राजस्थान, सौराष्ट्र, कच्छ या भागातून कोरडे व उष्ण वाऱ्यांचा जोर वाढला आहे़ त्याचा परिणाम अगदी जम्मू काश्मीरपासून ओडिशापर्यंतच्या तापमानात वाढ होण्यात झाला आहे़
कोकण वगळता सर्व प्रमुख शहरातील कमाल तापमान ४० अंशावर गेले आहे़ महाबळेश्वर येथे कमाल तापमान ३५ अंश आणि कोल्हापूर ३७़२ अंश सेल्सिअस होते. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान : अहमदनगर ४२़६, जळगाव ४४, , मालेगाव ४२़६, सोलापूर ४२़६, भिरा ४२, परभणी ४३़८, अकोला ४४़६, चंद्रपूर ४५़२.
वाळवंटी प्रदेशाकडून येणाऱ्या शुष्क गरम वाऱ्यांमुळे गुजरातपासून ओडिशापर्यंतचे कमाल तापमान वाढले आहे़ त्यामुळे सूर्याची उष्णता थेट खाली येत आहे़ याचा एकत्रित परिणामामुळे तापमानात वाढल्याचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले. (प्रतिनिधी)