भाजपाच्या लाचखोर नगरसेविकेला चार दिवसांची पोलीस कोठडी
By admin | Published: June 7, 2014 08:15 PM2014-06-07T20:15:20+5:302014-06-08T02:10:26+5:30
कारखाना दुरु स्तीसाठी लाच घेताना अटक झालेल्या भाजपा नगरसेविका वर्षा भानुशाली यांना चार दिवस दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मीरारोड : औद्योगिक वसाहतीतील कारखाना दुरु स्तीसाठी लाच घेताना अटक झालेल्या भाजपा नगरसेविका वर्षा भानुशाली यांना चार दिवस दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
भाईंदर पूर्वेकडील रेल्वे फाटकाजवळील विनोकेम्प इंडस्ट्रियल एस्टेटमध्ये राधा हर्षल पटेल यांचे १९७८ पासून पाच गाळे आहेत. त्यात बफिंगचे काम चालते. गाळा दुरु स्तीसाठी राधा पटेल यांनी २३ ऑगस्ट २०१३ ला महापालिकेत अर्ज केला होता. त्यानुसार महिन्यापूर्वी त्यांना परवानगी देण्यात आली होती. परंतु ही परवानगी दुरु स्तीसाठी आहे, उंची वाढविण्यासाठी नाही,असे सांगून भानुशाली यांनी त्यांचे काम करण्यासाठी पैशांची मागणी केली होती. त्यावरून राधा पटेल यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्र ार केली. त्याआधारे पोलीस निरीक्षक अशोक साळवे यांनी भानुशाली यांना अटक केली होती. (वार्ताहर)