खान्देशात पावसाचे चार बळी

By admin | Published: July 4, 2016 04:20 AM2016-07-04T04:20:25+5:302016-07-04T04:20:25+5:30

खान्देशात रविवारी पावसाचे चार बळी गेले; अन्य दोन घटनांमध्ये पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला. त्यात एक सेल्फीच्या नादात पाण्यात बुडाला.

Four days of rain in the catchment area | खान्देशात पावसाचे चार बळी

खान्देशात पावसाचे चार बळी

Next


जळगाव/धुळे : खान्देशात रविवारी पावसाचे चार बळी गेले; अन्य दोन घटनांमध्ये पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला. त्यात एक सेल्फीच्या नादात पाण्यात बुडाला.
भाटपुरा (ता. शिरपूर) शिवारात वीज पडून रामसिंग गंगाराम पावरा (२२) याचा मृत्यू झाला तर शेतमालक नरेंद्र माळी जखमी झाले. दुसऱ्या घटनेत चोपडा तालुक्यातील सालूर येथे नाल्याला अचानक आलेल्या पुरात उषाबाई वाघ (४२) व बबली उर्फ प्रणाली (१०) या मायलेकी वाहून गेल्या.
दुर्घटनेत चार जण बचावले आहेत. पुरात तीन बैलही वाहून गेले. लोणीसीम (ता. पारोळा) येथे घरात खेळत असताना अंगावर भिंत पडल्याने साहिल बाळू भिल (२) याचा जागीच मृत्यू झाला.
लळिंग किल्ला (ता. धुळे) येथे मोबाईलवर सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात बुडून रितेश अशोकराव जडे (१८) याचा मृत्यू झाला. चोपडा येथे पोहण्यास गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू झाला. सातवीतील गौरव शीतल भालेराव, चौथीतील राहूल भरत चौधरी यांना जीव गमवावा लागला. (प्रतिनिधी)

Web Title: Four days of rain in the catchment area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.