चार उपाधीक्षकांच्या बदल्या

By admin | Published: August 25, 2015 02:47 AM2015-08-25T02:47:39+5:302015-08-25T02:47:39+5:30

पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्याच्या कालावधी उलटून गेला असलातरी गृह विभागाकडून वरिष्ट अधिकाऱ्यांच्या टप्याटप्याने व सोयीनुसार बदल्या

Four Deputy Superintendents | चार उपाधीक्षकांच्या बदल्या

चार उपाधीक्षकांच्या बदल्या

Next

मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्याच्या कालावधी उलटून गेला असलातरी गृह विभागाकडून वरिष्ट अधिकाऱ्यांच्या टप्याटप्याने व सोयीनुसार बदल्या करण्याचे धोरण सुरु राहिले आहे. ठाणे पोलीस मुख्यालयायातील उपायुक्त सुनील लोखंडे यांच्यासह अन्य चार उपअधीक्षकांच्या विनंतीवरुन विशेष बाब म्हणून सध्याच्या ठिकाणाहून अन्यत्र बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलिसांच्या सर्वसाधारण बदल्या मे/जून मध्ये केल्या
जातात. मात्र पाच अधिकाऱ्यांनी विनंती केल्याने त्यांची बदली
करण्यात आल्याचे गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
त्यासाठी राज्य पोलीस
अधिनियम १९५१च्या कलम २२ (न)(२) अन्वये हा निर्णय घेण्यात आला. उपायुक्त लोखंडे यांची अमरावती (ग्रामीण) विभागात अप्पर अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
त्याचबरोबर उपअधीक्षक सर्वश्री (कंसात कोठून-कोठे): नरेश मेघराजानी (मनमाड- वाशिम), रामेश्वर सुपले ( पोलीस अ‍ॅकडमी नाशिक-मुंबई), राहुल खाडे ( पेण- मनमाड) व बजरंग बनसोडे (माहूर-अहमदनगर शहर) बदली करण्यात आलेली आहे.
यापैकी खाडे व बनसोडे यांची काही महिन्यापूर्वी बदली झालेल्या ठिकाणी ते हजर झालेले नाहीत. त्यांनी अन्यत्र बदली करुन घेतली आहे. (प्रतिनिधी)

राज्यात ७६३ पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या
गेली वर्षभर राज्यभरातील विविध पोलीस आयुक्तालय व अधीक्षक कार्यालयाच्या अधिपत्याखाली प्रत्यक्ष प्रशिक्षण घेत असलेल्या ७६३ परिविक्षाधीन उपनिरीक्षकांच्या विविध ठिकाणी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये सर्वाधिक २३० जणांना मुंबई आयुक्तालयातर्गंत नेमण्यात आलेले आहे. पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी नुकताच त्याबाबतचा आदेश जारी केला असून त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याची सूचना घटकप्रमुखांना केली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने (एमपीएससी) सरळ सेवा भरतीद्वारे उपनिरीक्षक पदाची परीक्षा उर्त्तीण ७६३ उमेदवारांनी एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण नाशिक पोलीस अकादमीमध्ये केले.
११० क्रमांकाच्या या तुकडीतील उमेदवारांची गेल्यावर्षी आठ आॅगस्टला राज्यभरातील विविध पोलीस घटकांमध्ये एक वर्षासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेली होती.

त्यांचा हा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना नियमित स्वरुपाच्या नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. बहुतांश अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाच्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे.
७६३ उपनिरीक्षकांपैकी सर्वाधिक २३०जण मुंबई पोलीस दलाला मिळालेले आहेत. त्यांच्या नियुक्त्या कायमस्वरुपी केल्याने सध्या कार्यरत असलेल्या पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे.

Web Title: Four Deputy Superintendents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.