इंदापुरातील भीमा नदीत 4 डॉक्टर बुडाले
By Admin | Published: April 30, 2017 09:01 PM2017-04-30T21:01:35+5:302017-04-30T22:10:33+5:30
सुट्टीनिमित्त इंदापूरमध्ये फिरायला आलेले चार डॉक्टर भीमा नदीच्या उजनी बॅक वॉटरमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे.
ऑनलाइन लोकमत
इंदापूर, दि. 30 - सुट्टीनिमित्त गावी फिरायला आलेले चार डॉक्टर भीमा नदीच्या उजनी बॅक वॉटरमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे. 10 डॉक्टर बोटीतून प्रवास करत होते. डॉक्टरांची ही बोट अचानक उलटली. यावेळी चार जण बुडाले, तर अन्य सहा डॉक्टरांनी पोहून स्वतःचा जिव वाचवण्यात यश आले आहे.
इंदापूर तालुक्यातील अजोती गावातील ही घटना आहे. बुडालेल्या चार जणांपैकी एकाचा मृतदेह आढळून आला आहे.
तर उर्वरित तीन जणांचा शोध सुरू आहे.
डॉ. सुभाष मांजरेकर (अकलूज), डॉ.महेश लवटे (नातेपुते), डॉ. अण्णासाहेब शिंदे, डॉ. उराडे (नातपुते) हे चार डॉक्टर पाण्यात बुडाले आहेत. डॉ. उराडे यांचा मृतदेह मिळाला आहे.
डॉ. प्रवीण श्रीरंग पाटील (माळशिरस), डॉ. दत्तात्रय भगवान सर्चे (माळशिरस), डॉ. अतुल विनोदकुमार दोशी (अकलूज), डॉ. श्रीकांत नंदकुमार देवडेकर (अकलूज), डॉ. समीर अशोक दोशी (अकलूज), डॉ. दिलीप तुळशीराम वाघमोडे (माळशिरस) या सहा डॉक्टरांना पाण्यातून बाहेर पडण्यात यश आलं.