चार गँगस्टर गजाआड

By Admin | Published: February 25, 2015 02:44 AM2015-02-25T02:44:49+5:302015-02-25T02:44:49+5:30

मुंबई गुन्हे शाखेने डोंबिवलीचे शिवसेना नगरसेवक व बिल्डर रमेश म्हात्रे यांच्या हत्येचा कट उधळून लावला. त्यांच्या हत्येची तयारी करणा-या

Four gangster goosehead | चार गँगस्टर गजाआड

चार गँगस्टर गजाआड

googlenewsNext

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने डोंबिवलीचे शिवसेना नगरसेवक व बिल्डर रमेश म्हात्रे यांच्या हत्येचा कट उधळून लावला. त्यांच्या हत्येची तयारी करणा-या चौघांना खंडणीविरोधी पथकाने काल मुलुंडमधून अटक केली. यातला एक आरोपी गँगस्टर रवि पुजारीशी संबंधित असल्याचे समजते.
संजीव कृष्णचंद्र वशिष्ठ ऊर्फ मन्ने ऊर्फ शर्मा, राजेश यादव ऊर्फ सागर, मनीषकुमार पाण्डे ऊर्फ भट आणि महेंद दिवे अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यापैकी संजीव व पाण्डे हे दिल्लीचे आहेत. संजीव दिल्लीचा असला तरी त्याच्याविरोधात मुंबई व ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली होती. तो काही वर्षे आर्थर रोड कारागृहात बंद होता. त्यातूनच त्याची ओळख राजेश ऊर्फ सागरशी झाली.
गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला खबऱ्यांंकडून या चौघांच्या हालचालींची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने काल मुलुंडच्या आर मॉॅल परिसरात सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ७.६५ बोअरच्या दोन पिस्टल, पंधरा जिवंत काडतुसे अशा शस्त्रसाठ्यासह मोबाइल फोनही सापडला.
संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या प्रत्येक बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवून कारवाया करण्याचे आदेश आयुक्त राकेश मारिया, तत्कालीन सहआयुक्त (गुन्हे) सदानंद दाते यांनी गुन्हे शाखेला दिले होते. ही कारवाइ त्याचाच एक भाग आहे. या कारवाईने पुजारीला धक्का बसलाच, मात्र दोघांचे प्राणही वाचले, अशी माहिती खंडणीविरोधी पथकाने ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Four gangster goosehead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.