७०० फूट खोल दरीतून २८ तासांनी चौघांना जिवंत बाहेर काढले

By admin | Published: December 28, 2015 07:51 AM2015-12-28T07:51:03+5:302015-12-28T09:19:49+5:30

महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुपच्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल ७०० फूट खोल दरीत कोसळलेल्या कारमधून २८ तासानंतर चौघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले.

Four hours out of the 700 feet deep 28 hours | ७०० फूट खोल दरीतून २८ तासांनी चौघांना जिवंत बाहेर काढले

७०० फूट खोल दरीतून २८ तासांनी चौघांना जिवंत बाहेर काढले

Next

ऑनलाइन लेकमत
सातारा, दि. २८ - महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुपच्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल ७०० फूट खोल दरीत कोसळलेल्या कारमधून २८ तासानंतर चौघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले. पुणे-महाबळेश्वर मार्गावर पोलादपूर घाटामध्ये शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास एक कार दरीत कोसळली होती. 

महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुपमधील एकाला मोबाईलवर या अपघाताची माहिती देणारा संदेश मिळाल्यानंतर ट्रेकर्स ग्रुपने प्रयत्न सुरु केले होते. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास चौघांना जिवंत बाहेर काढण्यात आले. या अपघातात चौघांना वाचवण्यात यश मिळाले असले तरी, पती-पत्नी दोघांचा जागीच मृत्यू झाला. 
जमुना खन्ना बिरानी आणि वेणूगोपाल स्वामी खन्ना बिरानी अशी मृतांची नावे आहेत. पोलादपूर घाटातील बिरवाडी गावाजवळ हा अपघात झाला. जखमींना पोलादपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त गाडीतील सर्व रहिवासी बंगळुरुचे आहेत. 
 

Web Title: Four hours out of the 700 feet deep 28 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.