जादूटोणाप्रकरणी मुंबईतील चौघे अटकेत

By admin | Published: June 30, 2014 01:54 AM2014-06-30T01:54:44+5:302014-06-30T01:54:44+5:30

तीन जणांना कर्जत पोलिसांनी अटक केली. खोदलेला खड्डा नरबळीसाठी होता का, अशा दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

Four inmates in Mumbai | जादूटोणाप्रकरणी मुंबईतील चौघे अटकेत

जादूटोणाप्रकरणी मुंबईतील चौघे अटकेत

Next
>कर्जत  : आपण सतत आजारी असल्याने एका मांत्रिकाने चार वर्षापूर्वी घरात रक्त टाक असे सांगितल्याने एक बकरा आणि कोंबडा कापून घरात खड्डा खोदणा:या एका इसमासह इतर तीन जणांना कर्जत पोलिसांनी अटक केली. खोदलेला खड्डा नरबळीसाठी होता का, अशा दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
कर्जत पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री कर्जत दहिवली ब्राम्हण आळीत राहणारे आणि सध्या मुंबईत राहणारे व एअर इंडियात कामाला असलेले मुकेश विष्णू आरेकर व त्यांच्या घरातील भाडेकरू सुभाष केशव सारवे व त्यांच्यासोबत मुंबई येथून आलेले 9 जण हे कर्जत दहिवली येथील आरेकर यांच्या घरात पैशांचा पाऊस पाडण्यास पूजाअर्चा करीत आहेत, अशी माहिती येथील स्थानिक माजी नगरसेवक नीलेश घरत यांना मिळाल्याने त्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीतून डोकावले असता एका खोलीत खोदलेला खड्डा व कापलेला बकरा, कोंबडा दिसला़ त्या वेळी त्यांनी चौकशी केली असता आरेकर यांनी माहिती दिली की, मी मुंबई येथे नोकरीस आह़े सतत आजारी असतो. चार वर्षापूर्वी मला एका मांत्रिकाने सांगितले की, तुङया गावाकडील घरामध्ये कोंबडा आणि बकरा याचे रक्त टाक़ त्यामुळे आजार बरा होईल, म्हणून हे केल्याचे सांगितले. त्यावरून नीलेश यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. घरमालक मुकेश आरेकर, भाडेकरू सुभाष सारवे, संजय गुरव व दिलीप गुरव ( रा. सांताक्रूज, मुंबई) अशा चार जणांना ताब्यात घेतले आहे. 
 
रविवारी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांच्यासमवेत पोलीस उपनिरीक्षक एम. व्ही. पवार, पोलीस उपनिरीक्षक एस. डी. पलांडे, पोलीस हवालदार जी. आर. मदगे, बाळा जाधव, पी. के. वाघमोडे हे उपस्थित होते. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. व्ही. पवार हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Four inmates in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.