पानसरेंच्या हत्येत चार मारेकरी - हर्षद निंबाळकर

By admin | Published: June 17, 2017 12:13 AM2017-06-17T00:13:37+5:302017-06-17T00:13:37+5:30

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांची हत्या चार मारेकऱ्यांनी केल्याचा दावा सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी सुनावणीवेळी केला. शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश

Four killers in Panesar's murder - Harshad Nimbalkar | पानसरेंच्या हत्येत चार मारेकरी - हर्षद निंबाळकर

पानसरेंच्या हत्येत चार मारेकरी - हर्षद निंबाळकर

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांची हत्या चार मारेकऱ्यांनी केल्याचा दावा सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी सुनावणीवेळी केला. शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश क्रमांक चार एल. डी. बिले यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक संशयित समीर विष्णू गायकवाड याच्याविरोधात प्रथमदर्शनी भक्कम पुरावे असून, प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळख परेडमध्ये समीरला ओळखले आहे. त्यामुळे समीरला जामीन मंजूर करू नये, अशी मागणी निंबाळकर यांनी केली. यावर समीरच्या जामीन अर्जावर उद्या, शनिवारी निर्णय देऊ, असे न्या. बिले यांनी सांगितले.
सरकारतर्फे निंबाळकर यांनी सुमारे अडीच तास युक्तिवाद केला. समीर गायकवाडला एका साक्षीदाराने ओळखले आहे. हा साक्षीदार घटनेदिवशी म्हणजे १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सायकलवरून घटनास्थळावरून शिकवणीच्या शिक्षिकांकडे जात होता. त्यावेळी त्याने संशयित आरोपीला पाहिले होते. त्यानंतर ही माहिती त्याने शिकवणीच्या शिक्षिका, त्याचे क्लासमधील मित्र आणि आई-वडील यांना सांगितली होती. समीरला अटक केल्यानंतर ओळख परेडमध्ये त्या साक्षीदाराने समीरला ओळखले, याकडेही निंबाळकर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

समीरला जामीन देऊ नका
यापूर्वी समीरचा जामीन अर्ज जिल्हा व उच्च न्यायालयाने फेटाळला आहे़ त्यामुळे त्याला जामीन मंजूर करू नये, अशी मागणी अ‍ॅड़ निंबाळकर यांनी न्यायालयात केली़

Web Title: Four killers in Panesar's murder - Harshad Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.