लोणावळा मार्गाचा चौपदरीकरण सव्र्हे
By admin | Published: July 9, 2014 02:13 AM2014-07-09T02:13:51+5:302014-07-09T02:13:51+5:30
रेल्वे अर्थसंकल्पात कसारा-इगतपुरी आणि कजर्त-लोणावळा या 16 ते 2क् किमीच्या घाट सेक्शनमध्ये चौपदरीकरण सव्र्हेक्षणाची घोषणा केली.
Next
ठाणो : रेल्वे अर्थसंकल्पात कसारा-इगतपुरी आणि कजर्त-लोणावळा या 16 ते 2क् किमीच्या घाट सेक्शनमध्ये चौपदरीकरण सव्र्हेक्षणाची घोषणा केली. त्या निर्णयाचे या मार्गावर कार्यरत असणा:या रेल्वे कर्मचा:यांसह हजारो रेल्वे प्रवाशांनी स्वागत केले आहे.
कसारा-इगतपुरी हा 16 किमीचा घाट सेक्शन असून, यामध्ये सध्या 3 लाइन आहेत. त्यापैकी अप/डाऊन मार्गाच्या मध्ये असलेल्या लाइनला कॉमन लाइन म्हटले जाते. तो मार्ग आपात्कालीन स्थितीत वापरला जातो. घाट सेक्शन असल्याने या ठिकाणी बहुतांशी रोजच या मार्गाची गरज भासते. मुख्यत्वेकरून मालवाहतूक होत असतांना ओव्हर लोडमुळे अथवा अन्य तांत्रिक कारणांमुळे मालगाडय़ा ठिकठिकाणी कधी अप तर कधी डाऊनवर फेल होतात. अशा वेळेस ही तिसरी लाइन उपयोगात आणली जाते. त्यामुळे अनेकदा मालगाडय़ांसह लांबपल्याच्या प्रवासी वाहतूक करणा:या शेकडो गाडय़ांवरही विपरीत परिणाम होतो. त्यासाठी ही चौथी लाइन होणो अत्यावश्यक असल्याचे मत इगतपुरीमधील या ट्रॅकवर कार्यरत असणा:या अभियंत्यांनी स्पष्ट केले.
मालगाडीसह अन्य गाडय़ांच्या इंजिन ड्रायव्हरच्यासाठीही हा मार्ग महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले. सध्या जी मिडल लाइन आहे ती दोन्ही दिशांच्या वाहतुकीसाठी वापरात आणली जाते. परिणामी त्या मार्गावर सर्व सिग्नल एकाच दिशेने आहेत. ही तांत्रिक अडचण मुख्यत्वेकरून इंजिन ड्रायव्हरची (पायलट्सची) होत असते. तो त्रसही कमी होईल.
सध्या त्यांचा तांत्रिकदृष्टय़ा होणारा गोंधळही कमी होईल आणि प्रवासही सुटसुटीत होईल. कर्जत-लोणावळा मार्गावरही अशीच समस्या असून, ती लवकरच सुटणार असल्याने या निर्णयाचे स्वागत केले. (प्रतिनिधी)
रेल्वेमंत्र्यांचा हा निर्णय स्वागतार्ह असून, त्याची अंमलबजावणी तातडीने होणो अत्यावश्यक आहे.
- अनिता झोपे, अध्यक्षा : कल्याण-कसारा रेल्वे पॅसे. असो.
या घोषणोमुळे घाट सेक्शनमधील कर्मचा:यांचा जीव भांडय़ात पडला आणि गोंधळामुळे वेठीस धरल्या जाणा:या हजारो प्रवाशांनाही दिलासा मिळाला.
- नितीन परमार, कर्जत रेल्वे प्रवासी संस्था