मोटारीच्या ७ क्रमांकासाठी मोजले चार लाख

By admin | Published: January 4, 2015 01:01 AM2015-01-04T01:01:55+5:302015-01-04T01:01:55+5:30

नववर्षारंभी मोटार खरेदी केलेल्यांनी आवडीचा आणि ‘लकी’ क्रमांक मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अक्षरक्ष: गर्दी केली होती.

Four million counted for car number 7 | मोटारीच्या ७ क्रमांकासाठी मोजले चार लाख

मोटारीच्या ७ क्रमांकासाठी मोजले चार लाख

Next

आरटीओमध्ये लिलाव : ९०९ क्रमांकाला अधिक पसंती; तीन तासांत ६४ लाखांचे उत्पन्न
पिंपरी : नववर्षारंभी मोटार खरेदी केलेल्यांनी आवडीचा आणि ‘लकी’ क्रमांक मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अक्षरक्ष: गर्दी केली होती.
शुभांक (लकी) क्रमांक मिळविण्यासाठी वाहनचालकांची शुक्रवारी झुंबड उडाली होती. हौशी मोटार मालकांनी आरटी ओ कार्यालयात क्रमांकाची नवीन मालिका सुरू होताच आवडता विशिष्ट क्रमांक मिळविण्यासाठी जीवाचे रान केले. एका क्रमांकाला अनेकांची पसंती असल्याने अनेक अर्ज दाखल झाले. त्या क्रमांकाचा लिलाव करण्याचा निर्णय उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी घेतला.
आवडत्या विशिष्ट क्रमांकासाठी मागणी वाढल्याने आरटीओ कार्यालयाने त्याचा फायदा उठवला. परिवहन कार्यालयाला झाला. तीन तासात तब्बल ६४ लाख ५० हजारांचे उत्पन्न या कार्यालयाने मिळवले. ७ क्रमांक मिळावा, यासाठी अनेकजण इच्छुक होते. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्याने जो जास्त रक्कम देईल, त्यास हा क्रमांक द्यायचा असा निर्णय घेण्यात आला. या क्रमाकांसाठी ४ लाखांची बोली लागली. ही आतापर्यंतची सर्वाधिक बोली असल्याची चर्चा शहरात रंगली.
मोटारीला ७ क्रमांक मिळवण्यासाठी सर्वाधिक बोली लागली. हा क्रमांक मिळावा म्हणून चार जाणांनी अर्ज केला. त्यामध्ये ५० हजार क्रमांकाची मुळ किमत असताना त्यावर ३ लाख ५१ हजार १५१ अशी बोली लावून क्रमांक खरेदी केला. त्यापाठोपाठ ०९०९ क्रमांक साठी ही नऊ जणांनी अर्ज केले. त्यामुळे त्या क्रमांकाचाही लिलाव करण्यात आला. या क्रमांकासाठी आरटीओने निश्चित केलेला दर १५ हजार होता. त्यावर ४० हजार ४०० शे १० रुपये बोली लावण्यात आली. इतर क्रमांकासाठी एक अथवा दोन असे अर्ज करण्यात आले होते. एकाच दिवशी ४०० लोकांनी बोली लावून आवडीचे क्रमांक मिळविले.
मोटार खरेदी करणे समाजात प्रतिष्ठेची बाब मानली जाते. मोटारीला आवडता व लकी क्रमांक मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात मोटार मालकांचा आग्रह असतो. आपल्या गाडीचा क्रमांक वेगळा असावा, उठून दिसावा किंवा त्यामधून आपण कोणी बडी असामी आहोत, असे भासविण्यासाठी अनेकजण विशिष्ट क्रमांक मिळविण्याचा अट्टाहास करतात. काहीही होवो, कितीही किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही, अशा इर्षेने आपल्यालाच क्रमांक मिळाला पाहिजे. यासाठी सगळ््यांचाच आग्रह असतो.
उद्योगपती, राजकारणी, प्रतिष्ठित व्यक्ती, श्रीमंत यांच्या गाड्यांवर विशिष्ट क्रमांक दिसून येतात. मुलामुलींच्या छंदासाठी म्हणून मोठी बोली लाऊन विशिष्ट क्रमांकाची खरेदी केली जात आहे. त्याची क्रेज समाजात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नवीन मोटारीची मालिका चालू होताच त्यातील आवडता क्रमांक घेण्यासाठी मोटार मालकांनी अर्ज सादर केले होते. एका क़्रमांकासाठी पाच ते सहा अर्ज आल्याने त्या त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात आला. त्यामध्ये मोटार मालकांनी आवडीचे आणि शुभांक मानले गेलेले क्रमांक घेण्यासाठी बोली लावली. (प्रतिनिधी)

कार्यालयात क्रमांकाची नवीन मालिका सुरुहोताच अनेक मोटार मालकांनी अर्ज केले. एकाच नंबर साठी अनेक अर्ज आल्याने लिलाव पद्धतीचा आवलंब करण्यात आला.
- अजित शिंदे
उपप्रादेशीक परिवहन अधिकारी

Web Title: Four million counted for car number 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.