नालासोपाऱ्यात बिल्डरच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक
By admin | Published: December 5, 2014 03:44 AM2014-12-05T03:44:54+5:302014-12-05T03:44:54+5:30
गेल्या महिन्यात नालासोपारा येथे झालेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.
वसई : गेल्या महिन्यात नालासोपारा येथे झालेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. ही हत्या बांधकाम व्यवसायाच्या स्पर्धेतून झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने पोलीस आता या चौघांची कसून चौकशी करीत आहेत. या घटनेतील शस्त्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
गेल्या ५ नोव्हेंबर रोजी नालासोपारा पूर्व भागातील आचोळे येथे राजेश अमरबहादूर सिंग (३७) या बांधकाम व्यावसायिकाची काही अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येतील आरोपी मोटरसायकलवरून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी धीरज उपाध्याय (२६, रा. बोरीवली), अमीर तोफीक खान (रा. नायगांव), महेश शेट्टी (रा. वसई) व संतोष शेट्टी (रा. बोरीवली) यांना अटक केली व त्यांच्याकडून गावठी कट्टा जप्त केला.
या हत्येमागील खऱ्या सूत्रधाराला अटक करण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. ही हत्या सुपारी देऊन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)