शिर्डीजवळ ट्रेलर-लक्झरी बसला अपघात, चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2016 11:57 AM2016-05-15T11:57:42+5:302016-05-15T11:57:42+5:30

नगर- मनमाड महामार्गावर पवंनचक्कीचे पाते घेऊन जाणारे ट्रेलर व लक्झरी बस यांच्यात रविवारी पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.

Four people were killed in a trailer-luxury bus near Shirdi | शिर्डीजवळ ट्रेलर-लक्झरी बसला अपघात, चार ठार

शिर्डीजवळ ट्रेलर-लक्झरी बसला अपघात, चार ठार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

 
राहाता, दि. १५ -  राहाता तालुक्यात पिंप्रीनिर्मल हद्दीवर नगर- मनमाड महामार्गावर पवंनचक्कीचे पाते घेऊन जाणारे ट्रेलर व लक्झरी बस यांच्यात रविवारी पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दूर्घटनेत ड्रायव्हर क्लिनरसह दोन महिलांचा मृत्यू झाला. तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. 
 
जखमिना शिर्डी येथील रुग्णालयात तर मृत्यू झालेल्यांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात मध्ये दाखल केले आहे. आरामबसचा नंबर mp 13 p 3954 आहे. कंटेनरचा नंबर gj 12 z 1336 आहे. मृतांपैकी फ़क्त जितेद्र रामरतन मुक्ती  (४३) यांचीच ओळख पटली आहे. मृतांच्या कुटुंबियांशी पोलीस संपर्क करीत आहेत.
 
 

Web Title: Four people were killed in a trailer-luxury bus near Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.