दिवस ‘लोक’मताचा ! मतदारराजा आज देणार महाकौल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:18 PM2019-04-28T23:18:39+5:302019-04-28T23:19:49+5:30

मतदानासाठी वेळ काढा जबाबदारी पार पाडा

four phase elections voting today | दिवस ‘लोक’मताचा ! मतदारराजा आज देणार महाकौल!

दिवस ‘लोक’मताचा ! मतदारराजा आज देणार महाकौल!

Next

मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या मतदारां पैकी शेवटच्या मतदारापर्यंत उभ्या असलेल्या मतदाराला टोकन वजा चिठ्ठी दिली जाणार असून रांगेत उभ्या असलेल्या मतदारांचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रि या सुरू राहणार आहे.
त्यानंतर आलेल्या कोणत्याही मतदारांना मतदान करता येणार नाही. जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरने ईव्हीएम पोहोचविणार
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्रॉंग रूमवर आणल्या जातील तिथे पुन्हा व्यविस्थत तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका कंटेनरमध्ये भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत विधानसभा क्षेत्रातील स्ट्रॉंग रूममध्ये पोहोचवल्या जातील.

काही गडबड झाली तर काय?
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दल सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी प्रभारी अधिकारी यांची निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका घेऊन निवडणुकीबाबत योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. रजेवर असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक बंदोबस्तासाठी ड्युटी वर परत बोलविण्यात आलेले आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्या करता पोलिस ठाण्यांमध्ये राखीव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. प्रत्येक पोलिस ठाणे स्तरावर लाठी, हेल्मेट ढाल, अश्रूधूर आदी साधनांसह प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना सज्ज ठेवण्यात आलेले आहे.

जलद प्रतिसाद पथक तैनात
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २४ तास पोलीस व राज्य राखीव दल या यंत्रणा सज्ज असून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर दंगा काबू योजना राबविण्यात येत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस ठाणे हद्दीत कॉर्नर मिटिंग, पायी गस्त, प्रभावीपणे करण्यात येत आहे. तर पोलीस मुख्यालयात जलद प्रतिसाद पथक व दंगल नियंत्रण पथक तैनात ठेवण्यात आलेले आहे. आदर्श आचारसंहितेचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होणार नाही यासाठी पालघर पोलीस २४ तास सतर्क राहणार असून कोणताही अनुचित प्रकार घडत असल्याचे कळल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

दिवस ‘लोक’मताचा!
मतदान सकाळी ७ वाजताच सुरू होणार असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा
पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँक, पोस्टाचे पासबुक, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत स्मार्ट कार्ड, जॉब कार्ड, छायाचित्र असलेली निवृत्तीवेतन कागदपत्रे, आधार कार्ड

 

Web Title: four phase elections voting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.