‘ग्रेनेड’ स्फोटात ४ पोलीस जखमी
By admin | Published: July 17, 2015 01:04 AM2015-07-17T01:04:03+5:302015-07-17T01:07:44+5:30
पोलिसांच्या मॉक ड्रीलमध्ये स्मोक ग्रेनेडचा स्फोट होऊन चार पोलीस जखमी झाल्याची घटना येथील शनि मंदिर चौकात गुरुवारी सकाळी घडली.
कोल्हापूर : शहरात केलेल्या रस्ते विकास प्रकल्पातील विजेच्या खांबांचे काम कायदे भंग करणारा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. शहरातील विजेच्या खांबांची व इलेक्ट्रिक कामांची सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने केलेल्या त्रयस्थ पाहणी केली होती. त्याचा अहवाल मूल्यांकन समिती सदस्य तथा असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट असोसिएशनचे संचालक राजेंद्र सावंत यांच्याकडे बुधवारी सादर केला. त्याची नोंद मूल्यांकन अहवालात घेण्यात येणार असल्याचे सावंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांर्तगत करण्यात आलेल्या भूमिगत केबल्स, एच पी लाईटस्, आर्थिंग आदी कामे ‘महावितरण’चे निकष व इंडियन इलेक्ट्रीसीटी अॅक्ट अॅन्ड इलेक्ट्रिसिटी आज्ञावलीनुसार झालेली नाही.
शहरातील प्रकल्पावेळी हलविणे गरजेचे असलेली विजेचे खांब पदपथाच्या मध्येच आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा व पादचाऱ्यांचा धोका निर्माण होऊ शकतो. या सर्व कागदपत्रांच्या आधारे ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता राजदीप यांच्याशी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. ही सर्व कामे नियमबाह्ण असल्याचे राजदीप यांनी स्पष्ट केले.
याकामी नागेंद्र पोतदार, एम. आर. नाईक, अभिजित जाधव, परशराम रेमानिचे, बाजीराव भोसले, महेश ढवळे, सुधीर पाटील, रवींद्र पाटील, अविनाश यादव यांनी कृती समितीच्या मदतीने या विद्युत खांबांची पाहणी केली होती.
(प्रतिनिधी)
विद्युत कामे कायद्याचा भंग करणारी आहेत. ही कामे मूल्यांकन अहवालातून वगळली जातील. यासाठी आवश्यक तांत्रिक कागदपत्रांचा आधार घेऊ. येत्या दोन दिवसांत मूल्यांकन अहवाल पूर्ण करून तो ‘एमएसआरडीसी’ला सादर केला जाईल.
- आर्किटेक्ट राजेंद्र सावंत