पोलीस आयुक्तालयासमोर चौघांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By Admin | Published: March 20, 2017 01:22 PM2017-03-20T13:22:11+5:302017-03-20T13:26:36+5:30
ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 20 - पोलीस विनाकारण त्रास देत असल्याच्या निषेधार्थ चार जणांनी पोलीस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 20 - पोलीस विनाकारण त्रास देत असल्याच्या निषेधार्थ चार जणांनी पोलीस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. सिडको ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलाश प्रजापती आणि अन्य कर्मचारी छळ करतात, खोटे गुन्हे दाखल करतात, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
16 मार्च रोजी पोलीस आयुक्त आणि विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदार रवीद्र ढेपे यांनी दिला होता. त्यानुसार, सोमवारी (20मार्च )पोलीस आयुक्त कार्यालयासमोर रवींद्र ढेपे, ज्ञानेश्वर ढेपे, अभिनंदन ढेपे, आकाश बनकर आणि फिरोज शेखने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठी दुर्घटना टळली.
या आंदोलनामुळे पोलिसांना बरीच धावपळ करावी लागली. तसंच आयुक्तालय परिसरात बराच काळ तणाव निर्माण झाला होता. एसीपी सी. डी. शेवगण, एसीपी गोवर्धन कोळेकर, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी प्रसंगावधान दाखवत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
https://www.dailymotion.com/video/x844ue9