यवतमाळच्या डाक पार्सलमध्ये निघाल्या चार तलवारी

By admin | Published: August 11, 2016 06:13 PM2016-08-11T18:13:52+5:302016-08-11T18:13:52+5:30

डाक खात्याच्या ‘सीओडी’ कुरिअरने अमृतसरवरुन यवतमाळात चक्क चार तलवारींचे पार्सल पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान डाक खात्याने

Four swords left in Yavatmal's postal parcel | यवतमाळच्या डाक पार्सलमध्ये निघाल्या चार तलवारी

यवतमाळच्या डाक पार्सलमध्ये निघाल्या चार तलवारी

Next
style="font-family: HelveticaNeue, "Helvetica Neue", Helvetica, Arial, "Lucida Grande", sans-serif; font-size: 16px;">ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 11 -  डाक खात्याच्या ‘सीओडी’ कुरिअरने अमृतसरवरुन यवतमाळात चक्क चार तलवारींचे पार्सल पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान डाक खात्याने अद्याप पोलिसांना सूचित केले नसून आपल्या स्तरावरच त्याची चौकशी चालविली आहे. 
चार दिवसांपूर्वी यवतमाळच्या डाक घरात सुमारे सहा फूट लांबीचा बॉक्स कुरिअर म्हणून आला. परंतु हा बॉक्स फाटल्याने संबंधित कर्मचाºयांनी त्याची तपासणी केली असता त्यात सुमारे पाच फुट लांबीच्या चार धारदार तलवारी आढळून आल्या. या तलवारी स्थानिक उमरसरा भागातील अमोल नामक युवकाच्या नावाने अमृतसरवरुन पाठविण्यात आल्याचे त्या पार्सलवर नमूद आहे. डाक विभागाच्या कुरिअरमधून घातक शस्त्रे, दारूगोळा व अतिज्वलनशिल वस्तू पाठविण्यास प्रतिबंध असताना या तलवारी अमृतसरवरुन यवतमाळपर्यंत सुखरुप आल्या कशा हा संशोधनाचा विषय आहे. या तलवारी पोस्ट मास्तरच्या ताब्यात आहेत. जिल्हा डाक अधीक्षकांनी या तलवारींच्या अमृतसरवरुन यवतमाळपर्यंत झालेल्या प्रवासाची चौकशी चालविली आहे. 
 
तलवारींसाठी युवकाने घातला वाद 
अमृतसरवरुन आलेले तलवारींचे हे पार्सल घेण्यासाठी उमरसरातील अमोल नामक युवक गुरुवारी दुपारी ३ वाजता यवतमाळच्या डाक कार्यालयात पोहोचला. एक हजार रुपये भरुन ही सीओडी (कॅश आॅन डिलिव्हरी) घेण्याची तयारी त्याने दर्शविली. मात्र डाक विभागाने या तलवारींचे पार्सल देण्यास त्याला नकार दिला. त्यामुळे त्याने डाक विभागाच्या अधिका-यांशी वादही घातला. अमृतसरवरुन पार्सलद्वारे चार तलवारी बोलविणाºया या अमोलचीही डाक विभागाकडून ‘कुंडली’ काढली जात आहे. 
 
डाक विभागाच्या पार्सलद्वार तलवारी आल्या आहेत. सध्या त्या पोस्ट मास्तरच्या ताब्यात आहेत. त्या कशा आल्या याची चौकशी केली जात आहे. चौकशीअंती पोलिसांना सूचित करायचे की कसे याचा निर्णय घेतला जाईल. 
- आनंद सरकार
जिल्हा डाक अधीक्षक, यवतमाळ 

Web Title: Four swords left in Yavatmal's postal parcel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.