चार हजार शिक्षकांची आंतरजिल्हा बदली

By admin | Published: June 16, 2017 12:51 AM2017-06-16T00:51:46+5:302017-06-16T00:51:46+5:30

पाच वर्षांच्या खंडानंतर या वर्षी राज्यभरातील सुमारे ४ हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचा हा पहिला टप्पा

Four thousand teacher interchanges changed | चार हजार शिक्षकांची आंतरजिल्हा बदली

चार हजार शिक्षकांची आंतरजिल्हा बदली

Next

- दिगांबर जवादे । लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पाच वर्षांच्या खंडानंतर या वर्षी राज्यभरातील सुमारे ४ हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचा हा पहिला टप्पा असून दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे.
यापूर्वी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे धोरण अतिशय किचकट व वेळखाऊ होते. संबंधित शिक्षकाला स्वत:ची आंतरजिल्हा बदली करायची असेल तर त्याला स्वत:च प्रस्ताव तयार करून त्यावर मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागत होती. या वर्षी मात्र शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीसाठी स्वतंत्र पोर्टल तयार केले. या पोर्टलवर आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या सुमारे २१ हजार शिक्षकांनी अर्ज केले.

Web Title: Four thousand teacher interchanges changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.