नाशिकमधील बेपत्ता झालेले 4 विद्यार्थी घरी सुखरूप पोहोचले

By admin | Published: July 14, 2017 08:27 AM2017-07-14T08:27:24+5:302017-07-14T08:50:32+5:30

दिंडोरी येथील मराठा विद्या प्रसारक (मविप्र) जनता इग्लिश स्कूलमधील इयत्ता नववीत शिकणारे बेपत्ता झालेले चार विद्यार्थी गुरुवारी रात्री घरी परतले आहेत.

Four unidentified students of Nashik reached home safely | नाशिकमधील बेपत्ता झालेले 4 विद्यार्थी घरी सुखरूप पोहोचले

नाशिकमधील बेपत्ता झालेले 4 विद्यार्थी घरी सुखरूप पोहोचले

Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 14 -  दिंडोरी येथील मराठा विद्या प्रसारक (मविप्र) जनता इग्लिश स्कूलमधील इयत्ता नववीत शिकणारे बेपत्ता झालेले चार विद्यार्थी गुरुवारी रात्री उशीरा घरी परतले आहेत. हे चौघेही जण शाळेत जातो असे सांगून सापुतारा येथे फिरायला गेल्याची माहिती समोर आली आहे. 
 
 मुलं घरी सुखरु पोहोचल्यानं पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मविप्र जनता स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेणारे दीपक कडाळे, जीवन बल्हाळ हे दोघं जण दिंडोरी येथे राहतात तर तळेगावात राहणारा अमोल सुदाम चौधरी व ओझरखेडमधील कुलदीप सुनिल देशमुख हे चारही जण शाळेत जातो असे सांगून गुरुवारी ( 13 जुलै ) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घरातील निघाले. पण शाळेत न जाता ते सापुतारा येथे फिरण्यास गेले.  
 
संध्याकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतर मुले घरी परतली नाही. म्हणून पालकांनी शोधाशोध सुरू केली असता चारही मुले बेपत्ता झाल्याचे उघड झाले. राञी उशीरा दिंडोरी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. पोलिसांचं एक पथक सापुतारा येथे रवाना करण्यात आले.  
 
पण यावेळी दिवसभर सापुतारा येथे निसर्ग दर्शन करत हे चारही जण रात्री एक वाजता घरी पोहोचले. सापुतारा येथे फिरायला जाऊ व पाच वाजेपर्यंत परत येऊ हा त्यांचा अंदाज चुकला व ते रात्री उशीरा घरी पोहोचले. 

Web Title: Four unidentified students of Nashik reached home safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.