येवला-मनमाड रोडवर चार वाहनांचा विचित्र अपघात, 9 जणांचा मृत्यू तर 16 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 09:10 PM2017-08-27T21:10:45+5:302017-08-27T21:12:52+5:30

येवला-मनमाड रोडवर चार वाहनांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 16 जण गंभीर जखमी आहेत.

Four vehicles collision on Yeola-Manmad road, 9 people lost and 20 others injured | येवला-मनमाड रोडवर चार वाहनांचा विचित्र अपघात, 9 जणांचा मृत्यू तर 16 जखमी

येवला-मनमाड रोडवर चार वाहनांचा विचित्र अपघात, 9 जणांचा मृत्यू तर 16 जखमी

Next

नाशिक, दि. 27 - येवला-मनमाड रोडवर चार वाहनांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 16 जण गंभीर जखमी आहेत. मृतामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. जखमींची अवस्था पाहता मृत्यूचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 
एसटी बस, क्रुझर, मारुती ओम्नी व्हॅन आणि बाईक अशा चार वाहणांचा विचित्र असा अपघात झाला आहे. या अपघातात ठार झालेले प्रवासी धुळे येथील रहिवासी आहेत. अपघात इतका भीषण होता की गाडीतील मृतदेह अखेर दरवाजा तोडून काढावे लागले. स्थानिक संभाजीराजे पवार, दत्ता निकम, आणि  सावरगाव येथील पवार कुटुंबियांनी केवळ 15 मिनिटात मदत कार्य करीत अपघातग्रस्थानां  उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. 

येवला शहरापासून मनमाडच्या दिशेने बाभूळगाव शिवारातील निजधाम आश्रमासमोर रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मनमाडकडून येवल्याकडे येणाऱ्या धुळे-पुणे या एसटी बसला (एम.एच.४०एन.९८२१) पल्सर मोटारसायकल (एम.एच.४१ ए.जे.२४८०) ओव्हरटेक करीत होती. त्याचवेळी येवल्याकडून मनमाडच्या दिशेने जाणारी क्रुझर (एमएच.२६ ए.एफ१४८७) जीपच्या उजव्या बाजूचा टायर फुटल्याने क्रुझर जीप पलटी होऊन मारुतीओम्नी व्हॅन ( एम.एच.१५ बी.एन. ६४६७ ) . या गाडीवर धडकली. क्रुझरचा वेग जास्त असल्याने क्रुझरसह मारुती ओम्नीव्हॅनचा चक्काचूर झाला.

अपघाताची तिव्रता एवढी होती कि अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता तर मृतांचे अवयव विखुरले गेले होते. एसटी बसला किरकोळ नुकसान झाले. जखमींची संख्या जास्त असल्याने खाजगी डॉक्टरांनी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये येऊन शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्यांना उपचारासाठी मदत केली. क्रुझर गाडीतील अपघातग्रस्त धुळे भागातील असून ते कोळेपेवाडी येथुन साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपुन क्रुझरमधून धुळे येथे घरी परतत होते. क्रुझरमध्ये १५ ते १६ जण प्रवास करीत होते. ज्याचा साखरपुडा होता तो नवरदेव विजय गांगुर्डे रा. धुळे हा गाडीमध्ये जागा नसल्याने मित्राबरोबर मागून मोटारसायकलवर येत होता. अपघातातील काही जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारार्थ नाशिक येथे हलवण्यात आले आहे.

Web Title: Four vehicles collision on Yeola-Manmad road, 9 people lost and 20 others injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.