दोन वर्षाच्या आरोहीचे ४ विक्रम
By admin | Published: March 26, 2017 04:06 AM2017-03-26T04:06:44+5:302017-03-26T04:06:44+5:30
येथील आरोही पावबाके वय २ वर्ष ४ महीने हिच्या नावावर चार विक्रम नोंदविले गेले आहेत. येथील प्राथमिक शिक्षक विजय
डहाणू : येथील आरोही पावबाके वय २ वर्ष ४ महीने हिच्या नावावर चार विक्रम नोंदविले गेले आहेत. येथील प्राथमिक शिक्षक विजय बाळासाहेब पावबाके यांची ती मुलगी. तिच्या समवयीन मुले भाषा बोलण्याचे प्राथमिक धडे घेत असतांना तिने मात्र इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड या भारतीयांचे जगभरातील रेकॉर्ड नोंदवणाऱ्या संस्थेत ४ विक्र म नोंदवले आहेत.
रेकॉर्ड नोंदणीच्या किडस मेमरी कॅटेगरी मध्ये तिने आपल्या अभिजात, अविश्वसनीय पाठांतर क्षमतेच्या जोरावर 1) youngest to read and recite English alphabets, 2) most number of images identified (190 images), 3) Youngest to recite more than 30 rhymes, 4) youngest to recite longest rhymes having 20 lines या चार विक्र मांची ची नोंद केली आहे . तिच्या विक्र मांची दखल घेण्यासाठी लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्स शी संपर्क केला असता आम्ही लहान मुलांचे रेकॉर्ड ठेवणे बंद केल्याचे सांगण्यात आले. परंतु यावरच न थांबता तिच्यात असलेल्या अभिजात स्मरणशक्तीची कुणीतरी नक्कीच दखल घेईल या हेतूने आरोहिच्या वडिलांनी इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड कडे आवश्यक कागदपत्रे व चित्रिफितीसह अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या टेस्टनंतर किड्स मेमरी कॅटेगरी मध्ये तिच्या या चार विक्र मांची नोंद झाली. यानंतर रेकॉर्ड सेटर्स- लंडन व इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्स या ठिकाणी देखील रेकॉर्डसाठी रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. ते लवकरच होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
छोट्या आरोहिच्या या अफलातून पाठांतर क्षमतेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तिची आई सरला पावबाके यांनी सांगितले की, प्ले ग्रुप, नर्सरी ग्रुप यांचे वाढलेले अवास्तव महत्त्व व मनमानी फी या पेक्षा त्यांनी आरोहिचा सराव घरीच घेण्याचे ठरवले व त्यात त्यांना यश मिळाले.
नर्सरीचा प्रघात सोडून घरीच मुलांचा अभ्यास घेऊन त्यांची अपेक्षित अध्ययन क्षमता विकसीत करावी, असे आवाहन त्यांनी पालकवर्गास केले.