साडेचार किलो सोने लंपास
By admin | Published: January 28, 2017 03:54 AM2017-01-28T03:54:57+5:302017-01-28T03:54:57+5:30
कामोठे सेक्टर २५ मधील हावरे सोसायटी जवळील जेएनपीटी रोडवर आलेल्या सहा व्यक्तींनी दोघांना जबर मारहाण करु न त्यांच्याकडील
कळंबोली : कामोठे सेक्टर २५ मधील हावरे सोसायटी जवळील जेएनपीटी रोडवर आलेल्या सहा व्यक्तींनी दोघांना जबर मारहाण करु न त्यांच्याकडील ४ किलो ४०० ग्रॅम सोने व ४८ हजार रोख रक्कम लंपास केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मारहाणीत जखमी झाल्याने दोघांना कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अज्ञात लुटारुंविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामोठेत शुक्र वारी वीटभट्टीजवळील जेएनपीटी रोडने गोरख शिंदे व विशाल शेगडे पनवेलकडे जात असताना पांढऱ्या स्विफ्ट कारमधून सहाजणांनी दोघांना मारहाण केली. त्यांच्याकडील ४ किलो ४०० ग्रॅम सोने व ४८ हजाराची रोकड घेऊन ते पसार झाले.
कामोठेत दोन महिन्यांपूर्वीही सूर्या पाटील बिल्डरच्या आॅफिसमध्ये तिघा जणांनी रिव्हॉलवरचा धाक दाखवून ५५ तोळे सोने व ६५ हजारांची रोकड लंपास केली होती. (प्रतिनिधी)