एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या

By admin | Published: March 21, 2017 03:30 AM2017-03-21T03:30:27+5:302017-03-21T03:30:27+5:30

एकाच कुटुंबातील पती-पत्नी व दोन मुलांची रविवारी रात्री अत्यंत निर्दयपणे धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना भादली बुद्रूक येथे उघडकीस

Fourth anniversary of killing of a single family | एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या

एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या

Next

जळगाव : एकाच कुटुंबातील पती-पत्नी व दोन मुलांची रविवारी रात्री अत्यंत निर्दयपणे धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना भादली बुद्रूक येथे उघडकीस आली आहे. हत्येबाबत काहीही सुगावा लागत नसल्याने पोलीसही चक्रावले आहेत. घटनास्थळावरील स्थिती काळजाचा थरकाप उडविणारी होती.
प्रदीप सुरेश भोळे (४५), संगीता (३५), दिव्या (६) व चेतन (४) यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालून त्यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. भोळे यांच्या घरात सोमवारी सकाळी मोबाइलची रिंग वाजत होती. बराच वेळ रिंग वाजत होती, त्यामुळे शेजारी राहणाऱ्या भोळे यांच्या चुलत काकू अलका भोळे घराकडे गेल्या. आवाज दिल्यानंतर घरातून प्रतिसाद मिळाला नाही, त्यांनी दरवाजा ढकलल्यानंतर भोळे कुटुंबीय रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. घटनेची माहिती गावात पोहोचताच सर्व गावकरी तेथे गेले.
भोळे यांच्याकडे तीन बिघे कोरडवाहू शेती होती. त्याचबरोबर ते स्वयंपाक कारागीर होते. घराचे बांधकाम व स्वत:चे हॉटेल सुरूकरण्यासाठी गावातील महेश पाटील यांना सहा लाखांना त्यांनी शेती विकली होती. तीन दिवसांपूर्वीच त्याची सौदापावती झाली. पाटील यांनी भोळे यांना ५० हजारांचा धनादेश व रोख ३५ हजार रुपये तीन ते चार टप्प्यांत दिले होते. रविवारीही पाच हजार रुपये दिले होते. (प्रतिनिधी)
सारेच अनाकलनीय
भोळे यांचे कुडाचे व पत्र्याचे घर आहे. दोन्ही बाजूंनी घरे असल्याने भिंती सामायिक आहेत. घरातील भांडे पडले तरी बाहेर आवाज येतो, मात्र चौघांची हत्या झाल्यानंतरही त्याचा आवाज कसा आला नाही, हे अनाकलनीय आहे.
महिलेच्या गुप्तांगावर हल्ला
हल्लेखोरांनी भोळे यांच्या डोक्यात तसेच मानेवर वार केले. दिव्या व चेतन यांच्या डोक्यात घाव घातला तर भोळेंच्या पत्नीवर डोक्यासह गुप्तांगावर घाव घातले आहेत. हे कुऱ्हाडीचे घाव असावेत, असे पोलिसांचे म्हणणे होते.

Web Title: Fourth anniversary of killing of a single family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.