फसवणुकीला आळा घालण्यासाठी ‘फोर्थ फोर्स’
By admin | Published: December 3, 2015 01:21 AM2015-12-03T01:21:39+5:302015-12-03T01:21:39+5:30
वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी माजी पोलीस अधिकाऱ्यांनी फोर्थ फोर्सची स्थापना केली आहे. लोअर परेल येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात सीबीआयचे माजी विशेष संचालक
मुंबई : वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी माजी पोलीस अधिकाऱ्यांनी फोर्थ फोर्सची स्थापना केली आहे. लोअर परेल येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात सीबीआयचे माजी विशेष संचालक आणि फोर्थ फोर्सचे अध्यक्ष व संचालक डॉ. सलीम अली यांनी या संबधीची घोषणा केली.
ते म्हणाले, ‘सीबीआय, रॉ, आरपीएफ आणि पोलीस या क्षेत्रांत काम करणाऱ्या १०० अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला असून, ही संस्था गुन्हेगारी प्रवृत्तींवर नजर ठेवेल.’ मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद, संस्थेच्या पश्चिम विभागाचे मुुख्य अधिकारी ई. नारायणन यावेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा पुरवणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. संभाव्य गुन्हेगारीला आळा घालण्याच्या हेतूने संस्था आॅनलाइन पद्धतीने काम करणार आहे. शिवाय हेल्पलाइनही संस्थेकडून पुरविण्यात आली आहे.
कर्मचारी नेमताना उपयोगी
- बीएफएसआय, टेलीकॉम, कॉर्पोरेट आणि रीटेल या क्षेत्राबरोबर घरगुती सेवा पुरवणाऱ्या नोकरदार वर्गाची संख्या मोठी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासूनच त्यांना कामावर ठेवल्यास, धोका टाळता येईल.
- एखाद्या व्यक्तीने सादर केलेली माहिती आणि स्वत:ची ओळख खरी आहे की खोटी? हे तपासण्यासाठी ही संस्था योग्य काम करेल, असे अहमद जावेद यांनी यावेळी सांगितले.