मिरजेतून चौथी ‘जलपरी’ लातूरला
By admin | Published: April 23, 2016 04:03 AM2016-04-23T04:03:51+5:302016-04-23T04:03:51+5:30
मिरजेतून २५ लाख लीटर पाणी घेऊन ‘जलपरी’ एक्स्प्रेसची चौथी खेप शुक्रवारी रात्री लातूरला पाठविण्यात आली. नदीतील जॅकवेल व रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून उच्च क्षमतेच्या
Next
मिरज : मिरजेतून २५ लाख लीटर पाणी घेऊन ‘जलपरी’ एक्स्प्रेसची चौथी खेप शुक्रवारी रात्री लातूरला पाठविण्यात आली. नदीतील जॅकवेल व रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून उच्च क्षमतेच्या पंपाद्वारे रेल्वे स्थानकाजवळील हैदरखान विहिरीत पाण्याचा साठा करण्यात येत आहे. विहिरीतून पाइपलाइनद्वारे टँकर भरण्याची यंत्रणा सुरळीत असून, लातूरला नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर पाणी भरल्यानंतर रात्री ‘जलपरी’ एक्स्प्रेस रवाना झाली. (प्रतिनिधी)