कोल्हापूरचे चौघे ‘आयर्नमॅन’ किताबाने सन्मानित

By admin | Published: November 17, 2015 12:56 AM2015-11-17T00:56:08+5:302015-11-17T01:00:47+5:30

हे अंतर एका दमात पूर्ण करण्यासाठी चौघांना १७ तासांचा अवधी. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या ‘आयर्नमॅन’चा किताब दिला जातो. दोन वर्षे ही स्पर्धा जिंकायचीच म्हणून सराव सुरू .

Fourth of the Kolhapur 'Ironman' book is honored | कोल्हापूरचे चौघे ‘आयर्नमॅन’ किताबाने सन्मानित

कोल्हापूरचे चौघे ‘आयर्नमॅन’ किताबाने सन्मानित

Next

कोल्हापूर : जगातील सर्वाधिक कठीण स्पर्धांमध्ये गणली जाणारी ‘आयर्न’ ही ट्रायथलॉन प्रकारातील स्पर्धा कोल्हापुरातील अनुप परमाळे, वैभव बेळगावकर, अक्षय चौगुले, पंकज रावळू यांनी पूर्ण करीत ‘आयर्नमॅन’ बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. मलेशिया येथील लंकावी येथे ही स्पर्धा झाली. कोल्हापूरच्या युवकांनी ही स्पर्धा जिंकून आणखी एक मानाचा तुरा रोवला.या स्पर्धेत या चौघांनी चार कि.मी. पोहणे, १८० कि.मी. सायकल चालविणे, ४२ कि.मी. धावणे यांचा समावेश आहे. हे अंतर एका दमात पूर्ण करण्यासाठी या चौघांना १७ तासांचा अवधी दिला जातो. त्यात ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना ‘आयर्नमॅन’चा किताब दिला जातो. या चौघांचा गेली दोन वर्षे ही स्पर्धा जिंकायचीच म्हणून सराव सुरू होता. या स्पर्धेत अनुप परमाळे (२५ ते ३० वयोगट) ३७ वा क्रमांक, तर स्पर्धेत ४९१ वा क्रमांक पटकावला. त्याने पोहणे प्रकारात १ तास ३१ मिनिटे ५३ सेकंद, सायकलिंगमध्ये ७ तास ३७ मिनिे १६ सेंकद, धावणे प्रकारात ६ तास ९ मिनिटे ३२ सेकंद अशी वेळ नोंदवत एकूण सर्व प्रकारांत १५ तास ४० मिनिटे आणि १६ सेकंदांच्या अवधित पूर्ण केली. तर वैभव बेळगावकर याने (१८ ते २४ वयोगटात) १६ वा क्रमांक, तर एकूण स्पर्धेत ४६९ वा क्रमांक प्राप्त केला. पोहणे प्रकारात १ तास ३२ मिनिटे २७ सेकंद, तर सायकलिंगमध्ये ६ तास ५३ मिनिटे ५ सेकंद, धावणेमध्ये ६ तास ४० मिनिटे ४० सेकंद अशी वेळ नोंदवित १५ तास २८ मिनिटे आणि ३४ सेकंदात पूर्ण केली. अक्षय चौगले याने (१८ते २४ वयोगटात) १२ वा क्रमांक, तर एकूण ३८३ वा क्रमांक पटकावला. त्याने पोहणेमध्ये १ तास २२ मिनिटे ३८ सेकंद, तर सायकलिंगमध्ये ६ तास २५ मिनिटे ०४ सेकंद, धावणेमध्ये ६ तास ४० मिनिटे ४० सेंकद अशी वेळ नोंदवित सर्व प्रकारांत त्याने १४ तास ४६ मिनिटे आणि ५४ सेकंदांची वेळ नोंदविली. पंकज रावळू याने (१८ ते २४ वयोगटात) सातवा क्रमांक मिळविला. त्याने पोहणेमध्ये १ तास २१ मिनिटे ३९ सेंकद, सायकलिंगमध्ये ५ तास ५० मिनिटे ०४ सेकंद, तर धावणेमध्ये ५ तास ३१ मिनिटे ५९ सेकंद अशी, तर संपूर्ण प्रकारात १२ तास ५२ मिनिटे आणि ५९ सेकंदात पूर्ण केली. मागील वर्षी आकाश कोरगावकर याने ही स्पर्धा वेळेत पूर्ण करीत किताब पटकावला होता.

Web Title: Fourth of the Kolhapur 'Ironman' book is honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.