शेतक-यांची बँकेवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 04:34 AM2017-07-28T04:34:30+5:302017-07-28T05:33:46+5:30
जिंतूर तालुक्याच्या बोरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत पीक विमा स्वीकारला जात नसल्याच्या निषेधार्थ शेतकºयांनी गुरुवारी परभणी-जिंतूर महामार्गावर रास्तारोको केला.
बोरी (जि. परभणी) : जिंतूर तालुक्याच्या बोरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत पीक विमा स्वीकारला जात नसल्याच्या निषेधार्थ शेतकºयांनी गुरुवारी परभणी-जिंतूर महामार्गावर रास्तारोको केला. यावेळी आक्रमक झालेल्या शेतकºयांनी बँकेवर दगडफेकही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी शेतकºयांवर सौम्य लाठीमार केला.
बोरी येथे महा-ई-सेवा केंद्रावरील वेबसाइट ठप्प झाल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांनी सकाळपासून गर्दी केली होती. मात्र राष्टÑीयीकृत बँकेचा बोजा असलेल्या शेतकºयांनी आमच्या शाखेत पीक विमा भरू नये, असे शाखाधिकारी आर.व्ही. सरोदे यांनी सांगितले. बचत खाते ज्या बँकेत आहे, त्याच बँकेत शेतकºयांनी पीक विमा भरावा, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी तेथे गोंधळ घालून बँकेचे कामकाज बंद पाडले.
त्यानंतर परभणी-जिंतूर महामार्गावर त्यांनी रास्ता रोको केले. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळाताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शाखाधिकाºयांना भेटून पीक विमा भरण्याचे काम सुरू करा, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर बँकेचे शटर उघडत असताना काही जणांनी बँकेवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार सुरू केला. त्यानंतर आंदोलक पळून गेले.