प्रवेशाच्या बहाण्याने ५५ लाखांना फसवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 04:32 AM2017-07-28T04:32:09+5:302017-07-28T04:32:13+5:30

नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील या महाविद्यालयात एका विद्यार्थिनीला एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली ५५ लाख रुपये

fraud 55 lakhs , thane, news | प्रवेशाच्या बहाण्याने ५५ लाखांना फसवले!

प्रवेशाच्या बहाण्याने ५५ लाखांना फसवले!

Next

ठाणे : नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील या महाविद्यालयात एका विद्यार्थिनीला एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली ५५ लाख रुपये घेणाºया महेश विठ्ठल अदाते (३७, रा. विटा, सांगली) याला नौपाडा पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
कळवा येथील रहिवासी अजित राणे यांच्या मुलीला नेरूळच्या या महाविद्यालयातील एमबीबीएसमध्ये पूर्व प्रवेश परीक्षेशिवाय २०१६-२०१७ या वर्षासाठी प्रवेश मिळवून देण्याचे वारंवार आमिष दाखवले. त्याच नावाखाली महेश अदाते याच्यासह पनवेलच्या संतोष सावंत आणि प्रवीण पाटील या तिघांनी त्यांच्याकडून रोकड आणि धनादेशाच्या माध्यमातून ५५ लाखांची रक्कम घेतली होती. १६ डिसेंबर २०१५ ते १३ आॅगस्ट २०१६ या कालावधीमध्ये ठाण्याच्या मासुंदा तलाव येथील साईकृपा येथे त्याने हे पैसे राणे यांच्याकडून घेतले होते. त्यानंतर, वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी ते पैसे परत केले नाही आणि एमबीबीएसला प्रवेश मिळाला नाही.
याप्रकरणी राणे यांनी १५ डिसेंबर २०१६ रोजी नौपाडा पोलीसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संतोष आणि प्रवीण यांना अटक केली. त्यांची यात जामिनावर सुटकाही झाली. परंतु, यातील मुख्य सूत्रधाराचा शोध लागत नव्हता. अखेर, तो नवी मुंबईतील हॉटेल एव्हरेस्ट येथे आल्याची टीप मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय गंगावणे, शिरीष यादव, हवालदार शब्बीर फरास आणि सुनील राठोड पथकाने त्याला गुरुवारी अटक केली.
डॉ. डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या आवारातच तो सूटबुटात वावरायचा. तिथेच छोटेसे कार्यालय थाटून त्याने अनेकांना अशाच प्रकारे प्रवेश मिळवण्याचे प्रलोभने दाखवली होती. त्याने आता आणखी किती जणांची फसवणूक केली, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कळवा येथील अजित राणे यांच्या मुलीला नेरूळ महाविद्यालयातील एमबीबीएसमध्ये पूर्व प्रवेश परीक्षेशिवाय २०१६-२०१७ या वर्षासाठी प्रवेश मिळवून देण्याचे वारंवार आमिष दाखवले. त्याच नावाखाली महेश अदाते, संतोष सावंत आणि प्रवीण पाटील यांनी त्यांच्याकडून ५५ लाख घेतले

Web Title: fraud 55 lakhs , thane, news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.