ठेकेदार कंपनीकडून फसवाफसवी

By Admin | Published: November 3, 2016 01:47 AM2016-11-03T01:47:45+5:302016-11-03T01:47:45+5:30

महापालिका प्रशासनाने मौन सोडत मुंबईतील प्रसिद्ध राणीच्या बागेतील परदेशी पाहुण्यांच्या पाहुणचारात कोणतीच कसूर न ठेवल्याचा दावा केला

Fraud by the contractor company | ठेकेदार कंपनीकडून फसवाफसवी

ठेकेदार कंपनीकडून फसवाफसवी

googlenewsNext


मुंबई: पेंग्विन मृत्यूप्रकरणी अखेर महापालिका प्रशासनाने मौन सोडत मुंबईतील प्रसिद्ध राणीच्या बागेतील परदेशी पाहुण्यांच्या पाहुणचारात कोणतीच कसूर न ठेवल्याचा दावा केला आहे. मात्र, परदेशी कंपनीशी भागीदारी असल्याचे खोटे सांगणाऱ्या ठेकेदार कंपनीची अनामत रक्कम जप्त करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पेंग्विन मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत आज उमटले. पेंग्विनसाठी कुठलाही तज्ज्ञ नाही, पशुवैद्यकीय अधिकारी नाहीत. प्रशासनाकडून याबाबत कोणताच खुलासा झालेला नाही. पेंग्विनसाठी आवश्यक वातावरण निर्मिती करण्यास पालिका प्रशासनाला पूर्णपणे अपयश आले आहे. यासर्व बाबींची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली .
यावर अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी हे सर्व आरोप खोडून काढत पेंग्विनसाठी न्यूझीलंडमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतलेल्या डॉक्टर मधुमिता यांच्यावर जबाबदारी दिली होती. त्यांनीही आटोकाट प्रयत्न केले. मात्र, उपचाराला दाद न मिळाल्याने एका पेंग्विनचा मृत्यू झाला, त्यांच्या खाण्यातही लक्ष दिले जात असून, त्यांच्यासाठी स्वच्छ करून खात्री करून बोंबील खाद्य म्हणून दिले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
>पेंग्विन मृत्यू प्रकरण, कंपनीकडून अटींचा भंग
पेंग्विनची व्यवस्था करण्यासाठी नियुक्त कंपनीची विदेशी कंपनीशी भागीदारी नाही. त्यामुळे या क्षेत्रातील अनुभवी कंपनीने भागीदारी अटीचा भंग केल्यामुळे
१ कोटी ४० लाखाची बँक गॅरंटी सील केल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

Web Title: Fraud by the contractor company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.