आर्थिक घोटाळ्याचा आरोप करून कामगाराला मारहाण
By admin | Published: February 16, 2015 03:29 AM2015-02-16T03:29:16+5:302015-02-16T03:29:16+5:30
पगार आणि थकबाकीची मागणी करणा-या प्रदीप त्रिवेदी या कामगारावरच १० लाखांच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप करून शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करण्यात आल्याच्या आरोपावरून
ठाणे : पगार आणि थकबाकीची मागणी करणा-या प्रदीप त्रिवेदी या कामगारावरच १० लाखांच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप करून शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करण्यात आल्याच्या आरोपावरून विनोद आणि दामोदर पटेल आणि त्यांचा मित्र अशा तिघांंविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून एका धनादेशावर जबरदस्तीने सह्णाही घेतल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
११ फेब्रुवारी २०१५ रोजी कंपनीचे मालक आणि त्यांचे मित्र भरतभाई यांनी त्रिवेदी यांना केबिनमध्ये बोलवून
घेतले आणि मारहाण करून शस्त्राच्या धाकाने कोऱ्या कागदावर सह्णाही घेऊन १५ एप्रिल २०१५ पर्यंत सर्व रक्कम परत करेन, असे त्यांनी बळजबरीने लिहून घेतल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे़
तसेच त्यांचे सारस्वत बँकेचे चेकबुक दामोदर यांनी जबरदस्तीने काढून त्यावरील एका चेकवर विनोद यांचे नाव टाकून त्यावर काही रकमेचा उल्लेखही केला. नंतर, त्यांना कंपनीच्या इनोव्हा गाडीतून दहिसर येथील घरी आणून सोडले. त्यानंतर, विनोद यांनी त्यांच्या मोबाइलवर फोन करून ‘पोलीस स्टेशनला तक्रार केलीस तर तुला व तुझ्या परिवाराला बरबाद करू’ अशी धमकी दिल्याचा आरोप प्रदीप यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी १४ फेब्रुवारी रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात मारहाण तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिशुपाल हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)