बनावट सोन्यातून बँकेची फसवणूक, तब्बल १ कोटी २९ लाख रुपयांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 03:32 AM2017-09-05T03:32:14+5:302017-09-05T03:32:23+5:30

बँक आॅफ इंडियाच्या खरांगणा (मोरांगणा) शाखेत बनावट सोने तारण ठेवून बँकेला तब्बल १ कोटी २९ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

 Fraudulent bank fraud, bank robbery of Rs.1.19 crore | बनावट सोन्यातून बँकेची फसवणूक, तब्बल १ कोटी २९ लाख रुपयांचा गंडा

बनावट सोन्यातून बँकेची फसवणूक, तब्बल १ कोटी २९ लाख रुपयांचा गंडा

Next

रूपेश खैरी ।
वर्धा : बँक आॅफ इंडियाच्या खरांगणा (मोरांगणा) शाखेत बनावट सोने तारण ठेवून बँकेला तब्बल १ कोटी २९ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंतच्या तपासात बँकेत गहाण सोन्यापैकी ५ किलो ८०० ग्रॅम सोने बनावट निघाले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या शेतकºयांना गाई देण्याच्या नावाखाली सोने गहाण ठेवून ही रक्कम उचलण्यात आली. मात्र ज्यांच्या नावे हे कर्ज उचलण्यात आले त्या शेतकºयांना यातील छदामही न मिळाल्याचे त्यांनी बँकेला सांगितले आहे.
बँकेत एकूण १४३ तारण खाती आहेत. या खात्यांचा सोमवारी तपास सुरूच असल्याने बँकेत खातेदारांची
गर्दी कामय होती. बँकेत ठेवलेल्या सोन्यावर उचललेल्या कर्जाची परतफेड झाली नसल्याने झालेल्या लिलावातून बनावट सोन्याचे
बिंग फुटले. यात पहिल्या टप्प्यात सात खातेदारांकडून ५४ लाख, तर दुसºया टप्प्यात नऊ
खातेदारांकडून सुमारे ७५ लाख रुपयांची उचल झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Web Title:  Fraudulent bank fraud, bank robbery of Rs.1.19 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा