बनावट ई-मेलद्वारे फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2016 02:35 AM2016-07-02T02:35:08+5:302016-07-02T02:35:08+5:30

व्यवस्थापकीय संचालकाच्या नावे बनावट मेल आयडी बनवून एका अज्ञात आरोपीने कंपनीला साडेचार लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले

Fraudulent via fake e-mail | बनावट ई-मेलद्वारे फसविले

बनावट ई-मेलद्वारे फसविले

Next

महेश चेमटे,

मुंबई- एका दिग्गज कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या नावे बनावट मेल आयडी बनवून एका अज्ञात आरोपीने कंपनीला साडेचार लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. सायबर क्राइमकडे ही तक्रार आल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
एका कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्याला व्यवस्थापकीय संचालकाच्या मेलवरून ‘तातडीने पैसे ट्रान्सफर करा’, अशा आशयाचा मेल येतो. हा मेल थेट कंपनीच्या संचालकाचा असल्याने मुख्य वित्तीय अधिकारी कोणतीही शहानिशा न करता मेलवरील बँक खात्यावर तातडीने पैसे पाठवतो. पण प्रत्यक्षात ते पैसे अज्ञात इसमाच्या खात्यात जमा झालेले असतात. या घटनेची नोंद बीकेसीमधील साइबर क्राइम पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. सध्या सायबर पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. फसवणूक झालेल्या कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्याला त्याच्याच कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या मेल आयडीवरून ‘आरटीजीएस रक्कम किती दिवसात ट्रान्सफर करू शकता? शक्य तितक्या लवकर या खात्यावर पैसे पाठवा’ असा मेल आला. या बनावट मेल आयडीमध्ये केवळ एका इंग्रजी अद्याक्षराचा बदल केल्याचे आढळून आले आहे. पैसे पाठवल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला पैसे पाठविल्याचा फोन केल्यानंतर ‘मी पैसे ट्रान्सफर
करण्याचा कोणताही मेल केलेला नव्हता’ असे सांगताच मुख्य वित्तीय अधिकाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीच्या संचालकांनी साइबर क्राइम पोलीस स्थानकात धाव घेतली. अज्ञात आरोपीच्या ई-मेल आयडी, बँक खाते, संगणकाच्या आयपी अ‍ॅड्रेसवरून आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: Fraudulent via fake e-mail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.