मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे बेमुदत उपोषण
By Admin | Published: January 19, 2016 03:44 AM2016-01-19T03:44:22+5:302016-01-19T03:44:22+5:30
कित्येक वर्षांपासून सरकारकडे पेन्शनची मागणी करणारे मराठवाडा मुक्ती संग्रामातील ५० स्वातंत्र्यसैनिक सोमवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत.
मुंबई : कित्येक वर्षांपासून सरकारकडे पेन्शनची मागणी करणारे मराठवाडा मुक्ती संग्रामातील ५० स्वातंत्र्यसैनिक सोमवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत.
जिल्हा गौरव समिती, उच्चाधिकारी समिती, मंत्रालयीन अधिकारी आणि खुद्द राज्यमंत्री यांनी दोन वेळा शिफारस केल्यानंतरही मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी मिळालेली नसल्याचे स्वातंत्र्यसैनिक संघर्ष समितीचे अध्यक्ष वसंत देशमुख यांनी सांगितले. १३ महिने भूमिगत राहून निजामाशी लढा दिल्यानंतरही सरकार दरबारी उपेक्षाच आल्याची प्रतिक्रिया १०० वर्षे वयाच्या महिलेने दिली. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून लढा देत असल्याचे त्यांनी सांगितले.